विकसित भारत यात्रेसाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यां बरोबर चर्चा
शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
विकसित भारत यात्रेसाठी पंचायत समिती नगर तालुक्याचे गट विकास अधिकारी सोनकुसाळे यांच्याकडे संपूर्ण नियोजनाची जबाबदारी प्रशासनाने सोपवली आहे. पंचायत समितीमध्ये बबनराव शेळके उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष ,भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभाग उत्तर महाराष्ट्र व अहमदनगर दक्षिणचे जिल्हा अध्यक्ष संजय कदम यांची मीटिंग झाली .विकसित भारत यात्रेची त्यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. संपूर्ण तालुक्याचे नियोजन कशा पद्धतीने आहे याची माहिती घेऊन प्रत्येक गावामध्ये सर्वच अधिकारी उपस्थित राहून प्रत्येक विभागाची माहिती, आपापल्या विभागाची जनतेपर्यंत माहिती पुरवावी असेही बबनराव शेळके आणि संजय कदम यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोनकुसाळे यांना चर्चेच्या वेळी सांगितले.

