शहरातील वाढत्या घाणकचऱ्यामुळे शहरातील नागरीकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता, घाणकचऱ्यामुळे वाढता डासांचा प्रादुर्भाव हा विविध रोगराईस आमंत्रण देण्यास कारणीभूत ठरत होता, अशावेळी शहरातील त्रस्त नागरीक नगर पालिका प्रशासनाकडे तक्रारीवर तक्रारी देत होते.
मात्र नगर पालिका प्रशासनाकडून ठोस म्हणावे असे पावले उचलले जात नसल्याचे पाहुन शेवटी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना नेते कार्यकर्ते यांना पुढाकार घेत श्रीरामपूर नगर पालिकेसमोर उग्र स्वरूपाचे आंदोलन करत नगर पालिका प्रशासनाने संबंधित शहरातील जनतेच्या आरोग्याप्रश्नी लक्ष वेधले याकरीता अक्रमकता दाखवणे भाग पडले त्याचे फलस्वरुप आज शहरात एका फोटो वर क्षणात कचरा उचलला जात आहे.
याचे सर्व श्रेय श्रीरामपूर शिवसेना नेते,कार्यकर्ते यांना जाते. कारण पुढे याच कर्तव्यशिल शिवसेना कार्यकर्यांनी
पुढे असाही एक अनोखा उपक्रम सुरु केला तो पुढील प्रमाणे -
*श्रीरामपूर शहर आरोग्यसेवा
या नावाने मा.संजय छल्लारे मा. सिद्धांत छल्लारे,मा.सुधीर (आप्पा) वायखिंडे या ग्रुप ऐडमिन महोदयांच्यावतीने जो *श्रीरामपूर शहर आरोग्य सेवा* हा व्हॅटसॲप ग्रुप बनविण्यात आलेला आहे तो शहरातील जनतेसाठी खुपच महत्वाचा आणी फायदेदायी ठरत आणी ठरला असल्याने ग्रुप ऐडमिन महोदयांचे मनस्वी आभार तथा त्यांच्या अशा या परोपकारी उपक्रमास हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
कारण या ग्रुपमुळे अत्यल्पकाळात फार मोठ्या प्रमाणात शहरवासियांना फायदा होत असल्याचे ठळकपणे दिसून येत आहे,शहरातील वाढलेले कॉंग्रेस गवत असो की घाणकचरा क्षणात साफ होताना दृष्टीपथासही येत आहे,याचे मुळ आणी मुख्य कारण म्हणजे शहरात दिसेल त्याठिकाणीच्या कचऱ्याचे फोटो काढून लोकेशन सह दाखविले गेल्यास संबंधित विभागाचे कर्मचारी येवून तो कचरा तात्काळ साफ करत आहेत हे महत्त्वाचं आहे त्याचंही कारण असं आहे की या व्हॅटसअप ग्रुप मध्ये श्रीरामपूर नगर पालिकेचे मुख्याधिकारी श्रीमान गणेश शिंदे साहेब देखील समाविष्ट आहेत. सोबतच शहरातील घाणकचरा साफ करणारे कर्मचाऱ्यांबरोबर अधिकारी देखील आहेत,करीता फोटो पाहताक्षणी विना विलंब सर्वांच्या लक्षात येते आणि काही सांगण्या आगोदरच सदरील ठिकाणाचा कचरा साफ केला जातो,यात जसे ग्रुप ऐडमिन महोदय आणि संबंधित नगर पालिका आरोग्य व्यवस्थाप यंत्रणा मनलावून आपले कार्य करत आहेत त्याप्रमाणेच आपणही शहसरातील समस्त जागरुक नागरीक या नात्याने शहरात कचरा किंवा इतर ज्या काही नागरी समस्या दिसेल त्याचे तात्काळ फोटो काढून लोकेशन देत या ग्रुपवर शेअर करावेत, म्हणजे संबंधित यंत्रणेच्या देखील लक्षात येते की कचरा आणी असल्यास काही उणीवा या नेमक्या कोणत्या ठिकाणी आहेत तथा त्यावय पुढे उचित कार्यवाही केली जाते. असे सर्वांनी मिळून मनावर घेतल्यास आपले श्रीरामपूर शहर हे स्वच्छ आणि सुंदर होण्यास पुन्हा जराही विलंब लागणार नाही असे मला वाटते.
तसेच खुपच महत्वाच्या आणि शहरातील समस्त नागरीकांच्या आरोग्याशी निगडित ज्वलंत अशा आवश्यक गरजेच्या कामांसाठी वेळेत वेळ देवून ग्रुप ऐडमीन महोदय तथा समस्त जागरुक सदस्यगण मोठी मेहनत घेत आहेत करीता ज्या उद्देशाने ग्रुपची निर्मीत करण्यात आली आहे त्या विषयांवितिरिक्त इतर कोणतेच विषय,बातम्या किंवा अन्य काही असे या ग्रुप वर शेअर करण्यात येवू नये अशी विनंती आहे. सोबतच सदरील ग्रुप ऐडमीन महोदयांनी शहरवासियांच्या आरोग्याविषयी हाती घेतलेली ही मोहीम अत्यंत चांगली आणि स्तूतीस पात्र अशी असल्याने शहरातील एक नागरीक म्हणून या स्तूत्य उपक्रमास खुप खुप शुभेच्छा तथा पुनश्च एकदा ग्रुप ऐडमिन महोदयांचे मनस्वी आभार 🙏
अशा या स्तूत्य उपक्रमाची सुरुवात श्रीरामपूर शहरातून प्रथमतः झाली आहे, पुढे भविष्यात प्रत्येक गांव/ शहर ग्राम पंचायत,नगर पालिका, महानगर पालिका अशा विविध गावे आणी शहरे यातील जागरुक नागरीकांनी श्रीरामपूर सारखे अनुकरण करत तथा पुढाकार घेत अशा आरोग्य विषयक व्हॅटसअप ग्रुप सुरु करावेत यामुळे केवळ गांव/शहरातूनच नव्हे तर राज्यभर आणी देशभरातून रोगराईस पिटाळून लावणे शक्य होणार आहे, याकरीता या मोहिमेत पुढाकार घेण्यासाठी तरुणांनी धाडसाने पुढे आले पाहिजेत हे मात्र खरे.
शहर स्वच्छतेबाबत प्रत्येक
नागरीक दखल घेईल !
तेव्हाच आपलं शहर
स्वच्छ आणि सुंदर होईल !!
- शौकतभाई शेख - श्रीरामपूर

