भोकर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील प्रगतशिल शेतकरी व अशोक सहकारी साखर कारखाण्याचे उपाध्यक्ष पुंजाहरी तुकाराम शिंदे यांचे वडील व भोकर येथील ज्येष्ठ शेतकरी तुकाराम मुरलीधर शिंदे (वय-९०) यांचे नुकतेच अल्पश: आजाराने व वृद्धपकाळाने निधन झाले.
त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, पुतणे, सुना,जावई, नातवंडे व परतवंडे असा मोठा परीवार आहे. येथील संजीवनी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष व भोकर काँग्रेसचे अध्यक्ष रामदास दाजीबा शिंदे, घुमनदेव सोसायटीचे माजी अध्यक्ष दिलीप चांगदेव शिंदे, अहमदनगर येथील ओमसाई इंजिनिअरींगचे आण्णासाहेब दाजीबा शिंदे, शेतकरी असलेले उत्तम दाजीबा शिंदे, घुमनदेव येथील दत्तात्रय व नानासाहेब चांगदेव शिंदे यांचे ते चुलते होत तसेच भोकर सोसायटीचे माजी अध्यक्ष सागर सुरेश शिंदे, डॉ.श्रेयस पुंजाहरी शिंदे व परीमल रमेश शिंदे यांचे ते आजोबा होत.
प्रगत व विकसीत शेती करणारे ज्येष्ठ शेतकरी म्हणून त्यांची ख्याती आहे. शांत व अभ्यासू स्वभाव, सकारात्मक, उच्च विचार सरणीतील ज्येष्ठ व्यक्तीमत्व व सामाजीक दायीत्व या गुणांमुळे त्यांचे अंत्यसंस्कार प्रसंगी मोठा जनसमुदाय उपस्थीत होता.
*पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111

