shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प.पू.प. महंत ब्रीजलालदादा पंजाबी..


 "जो आवडतो सर्वांना
 तोचि आवडे देवाला
दीन भुकेला दिसता कोणी 
घास मुखींचा मुखी घालुनी 
दुःख नेत्रींचे घेता पिळुनी 
फोडी पाझर पाषाणाला 
तोचि आवडे देवाला "

  असं संतत्व आणि माणुसकीचं ममत्व असलेले परमपूज्य महंत ब्रीजलालादादा पंजाबी उर्फ अण्णा यांनी मनामनात सद्गुणांचा ज्ञानदिवा लावला. नाशिक जिल्ह्यातील निफाड  तालुक्यतील गोंडेगाव शिंगवे येथे एका शेतकरी डावरे परिवारात त्यांचा १४ सप्टेंबर १९४८ रोजी  जन्म झाला.तर  दि. २९ नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. आता उरल्या त्या ह्रदयातल्या ऋणानुबंध स्वरूपातल्या आठवणी होय. 
श्रीरामपूरच्या श्रीकृष्णनगरमधील  महानुभाव आश्रम व श्रीकृष्ण मंदिराचे प्रमुख परमपूज्य परम महंत श्री ब्रीजलालदादा पंजाबी यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झालेले.त्यांचे मूळ नाव बबन डावरे होते. येथे एक वर्षाचे असतानाच त्यांना संगमनेर जवळ असलेल्या निमज येथे महंत बाबुराजबाबा पंजाबीकडे सुपूर्द करण्यात आले आणि ते ब्रीजलालदादा पंजाबी झाले.
महंत बाबुराजदादा सह ते २२ ऑक्टोबर १९६८ ला श्रीरामपूरला आले.श्रीरामपूरच्या रेल्वे ओव्हर ब्रीजजवळ असलेली जागा जयवंता पाटील गवारे परिवाराने दान दिली.त्या जागेत झोपडी बांधली. पुढे श्रीकृष्ण मंदिर झाले. महंत ब्रीजलालदादा पंजाबी उर्फ अण्णा यांनी श्रीकृष्ण मंदिरासह आश्रम व विविध वास्तू बांधून विविध उपक्रम घेतले.०८ डिसेंबर १९९५ रोजी तपस्विनी शकुताई यांना संन्यासदीक्षा देण्यात आली आणि आश्रम व मंदिराचा कायापालट झाला. २७ डिसेंबर १९९७ रोजी श्रीकृष्ण मंदिराचे उदघाट्न झाले. २००० साली मंदिराचे कलशारोहण झाले. परमपूज्य महंत बाबुराजबाबा यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे बाबांना योग प्राप्त झाला. 
२००३ साली तपस्विनी शैलाताई, स्वातीताई यांचा संन्यासदीक्षा उपक्रम संपन्न झाला.श्रीकृष्ण मंदिर आणि आश्रम धर्मकार्यास गती मिळाली. निमज येथेच बबन डावरे यांना महंत बाबुराजदादा पंजाबी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले होते, म्हणून आपल्या गुरुची आठवण म्हणून महंत ब्रीजलालदादा पंजाबी यांनी तेथे श्रीदत्तसेवा आश्रम सुरु केला. 
या काळात महंत कृष्णराजबाबा यांनी त्यांना विशेष सहकार्य केले. सध्या श्रीरामपूरच्या महानुभाव आश्रमात तपस्विनी चंद्रकलाताई,  शकुताई, मनोरमाताई, शैलाताई, स्वातीताई,  गोंविदबाबा, विशालबाबा, विद्याताईसह  दहा  महानुभावीय धर्म, सेवाकर्म करीत आहेत.
 भोकर येथील आम्नायाचार्य परमपूज्य महंत श्री गुंफेकरबाबा आणि आश्रमस्थ परिवार तसेच इ. श्री. डॉ.जनार्दनदादा बीडकर  यांनी महंत ब्रीजलालादादा पंजाबी हे शेवटच्या आजारीपणात असताना त्यांचे अंगलग मनोभावे सेवा केली. 
   प. पू. प. महंत      ब्रीजलालदादा पंजाबी यांनी श्रीकृष्ण भक्तीचा आदर्श पंचक्रोशीत निर्माण केला. आम्ही म्हणजे मी डॉ. बाबुराव उपाध्ये आमचे वाचन संस्कृती प्रतिष्ठान, डॉ. शिवाजी काळे यांच्या साहित्य प्रबोधन मंच, लेविन भोसले यांच्या प्रकाश किरण प्रतिष्ठान, सुखदेव सुकळे यांच्या विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान,पत्रकार, कवी राजेंद्र देसाई, गणेशानंद उपाध्ये यांच्या संत गोरा कुंभार संघटना, पोपटराव पटारे यांचे साहित्य परिवार टाकळीभान अशा अनेक  साहित्यिकग्रुपतर्फे बाबांनी अनेक उपक्रम घेण्यास मदत केली. या मंदिरात त्यांनी श्रीकृष्ण, श्रीचक्रधरस्वामी जयंतीनिमित्त विद्यार्थी,मान्यवर यांचे निबंध, वक्तृत्व, चित्रकलास्पर्धा, रांगोळी, पुस्तक प्रकाशने, प्रदर्शने आणि विद्यार्थी शिकवण्या असे अनेक उपक्रम घेतले.यानिमित्ताने देवगडचे ह.भ.प.महंत भास्करगिरी महाराज, मराठीतील लेखक शिवाजी सावन्त, ॲड. रावसाहेब शिंदे, प्राचार्य टी. ई. शेळके, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे,ह.भ. प. प्रा. सखाराम कर्डिले महाराज,प्रा. प्रकाश  कुलकर्णी, प्रा. डॉ. अनिल करवर, रामायणाचार्य ह.भ. प. अरुणनाथगिरी महाराज, प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड, डॉ. राजधर आराध्य, डॉ.रवींद्र कुटे, पोपटराव आदिक, प्राचार्य किसनराव वमने, माजी मुख्याध्यापक भागवतराव मुठे पाटील, साहेबराव पवार,प्रभाकर पवार,निमज गावातील चेअरमन संपतराव डोंगरे पाटील, रामनाथशेठ डोंगरे, संतोष  सुभाष डोंगऱे व डोंगरे,काळे, बिबवे परिवार व ग्रामस्थ तसेच शशिकांतभाऊ शिंदे,किशोरभाऊ शिंदे,धरमपाल आनंद,राजू साहानी, श्रेष्ठा आनंद,विकी भसीन, पद्माकर देशमुख तसेच  श्रीकृष्णनगर, रामकृष्णनगर, इंदिरानगर,परिवाराचे यांचे विशेष सहकार्य बाबांना  लाभले. तसेच मान्यवर महानुभावीय अभ्यासकांची व्याख्याने झाली. महंत ब्रीजलालादादा पंजाबी एक धर्मप्रेमी, समाजप्रेमी आणि सर्वांना आपलेसे करणारे होते. त्यांच्या अनेक स्मृती सदैव प्रेरणादायी ठरणाऱ्या आहे. 

"जेथें दिव्यत्वाची प्रचिती
  तेथे कर आमची जुळती "
या शब्दात त्यांना नमन आहे. 
= डॉ. बाबुराव उपाध्ये
श्रीरामपूर - 9270087640
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close