shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

यशवंतराव चव्हाण कला क्रिडा महोत्सव अंतर्गत बीट पातळीवर क्रीडा स्पर्धेत शिंदेवस्ती शाळेचे दुहेरी यश...

यशवंतराव चव्हाण कला क्रिडा महोत्सव अंतर्गत बीट पातळीवर क्रीडा स्पर्धेत शिंदेवस्ती शाळेचे दुहेरी यश...
इंदापूर प्रतिनिधी: दि १४ एलजी बनसुडे विद्यालय पळसदेव येथे भिगवण बीट पातळीवर क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. गीता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे व कार्याध्यक्षा नंदा बनसुडे , विस्तार अधिकारी हनुमंत शिंदे , प्राचार्य वंदना बनसुडे यांचे प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न झाला. लोकनृत्य स्पर्धेने या कला क्रीडा महोत्सवाची सुरूवात झाली. 
        लहान गट खो खो स्पर्धेत शिंदेवस्ती शाळेतील मुले व मुलींच्या संघाने अंतिम सामना जिंकुन उपस्थितांची मने जिंकली. मुलींच्या संघाने प्रथम सामन्यात भिगवण संघाचा ८-२ ने सफाईदार विजय मिळवला तर अंतिम सामन्यात डाळज संघाचा ३-१ ने पराभव केला आणि तालुकास्तर स्पर्धेसाठी आपली दावेदारी प्रस्तुत केली तर मुलांच्या संघाने प्रथम सामन्यात वरकुटे संघाचा ७-१ असा सहज विजय मिळवला तर अंतिम सामन्यात मराडवाडी डाळज संघाचा ७-१ असा सफाईदार विजय मिळवला मुलामधून दर्शन बनसुडे , कार्तिक शिंदे यांनी ३ मिनिटे बिनबाद संरक्षण करून प्रत्येकी ३ गडी बाद केले तर मुलींमधून भक्ती बनसुडे नाबाद ३ मिनिटे संरक्षण, अदिती भोंग २ मिनिटे संरक्षण तर मधुरा बनसुडे ,भक्ती बनसुडे ने प्रत्येकी ४ खेळाडू बाद केले मार्गदर्शक शिक्षक राहुल कानगुडे व मुख्याध्यापक उन्मेश कुचेकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. धावती उंचउडी स्पर्धेत कार्तिक शिंदे ने द्वितीय क्रमांक मिळवला.*
          शाळा व्यवस्थापन बैठक व पालक मेळाव्या मध्ये सर्व यशस्वी खेळाडूंचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करण्यात आले. सर्व खेळाडूंना  आवश्यक ते सर्व साहित्य सम्पूर्ण किट श्री विशाल बनसुडे यांनी पुरवले त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्या सौ कोमल सुभाष बनसुडे, माजी सदस्य श्री धनंजय बनसुडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री प्रदिप शिंदे, उपाध्यक्षा सौ कविता बनसुडे, श्री जयराम शिंदे गुरुजी , श्री कल्याण बनसुडे इतर नागरिक महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुत्रसंचालन संतोष हेगडे यांनी केले व आभार  मुख्याध्यापक उन्मेष कुचेकर यांनी मानले.
close