shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड नोंदणी प्रक्रियेला अधिक गती द्या -डॉ.ओमप्रकाश शेटे


अहमदनगर जिमाका वृत्तसेवा: 
सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून सामान्यांना आरोग्याच्या सेवा मोफत व अधिक दर्जेदार मिळाव्यात यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत पाच लक्ष रुपयांपर्यंत उपचार मोफत स्वरुपात देण्यात येत असल्याने या योजनेंतर्गत गोल्डन कार्ड नोंदणी प्रक्रियेला अधिक गती देण्याचे निर्देश आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे यांच्या उपस्थितीत आयुष्यमान भारत, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभुत सुविधांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, आयुष्यमान भारत योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. वसीम शेख, जिल्हा समन्वयक डॉ. मयूर मुथा, जिल्हा समन्वयक रोहित कारंडे आदींची प्रमुख उपस्थिती.  
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कोल्हापूर व अहमदनगर हे दोन जिल्हे कार्ड वितरणामध्ये राज्यात अग्रेसर आहेत. जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन व कौतुक करत डॉ. शेटे म्हणाले की, जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी आरोग्य उपचारापासून वंचित राहणार नाही यासाठी आरोग्य यंत्रणेसोबत इतर संबंधित शासकीय यंत्रणांनी गोल्डन कार्ड नोंदणी व प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरण प्रक्रिया गतिमान पद्धतीने राबवावी. या योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांच्या होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत गोल्डन कार्ड नोंदणी आणि वितरणासाठी विशेष नियोजन करण्याच्या सुचनाही डॉ.. शेटे यांनी यावेळी केल्या.
महापालिका क्षेत्रात कार्डची नोंदणी कमी असल्याने महापालिकेने गोल्डन कार्डची संख्या वाढविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करत या कामाचा दैनंदिन आढावा घ्यावा. जिल्ह्यातील धार्मिकस्थळाच्या ठिकाणी मोहिमेसाठी देवस्थान व्यवस्थापनाची मदत घ्यावी. त्याचबरोबरच प्रत्येक रुग्णालयामध्ये गोल्डनकार्ड नोंदणी व वितरणासाठी विशेष कक्ष सुरु करण्यात यावा. जिल्ह्यातील सीएससी केंद्रांनी राष्ट्रकार्य म्हणून अधिकाधिक कार्डची नोंदणी करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.  

प्रारंभी आयुष्मान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक  डॉ. मयूर मुथा यांनी या योजनेअंतर्गत जिल्ह्यात केलेल्या कामाची माहिती सादर केली. जिल्ह्यात आयुष्मान भारत  योजनेंतर्गत३१ लाख ६५ हजार १२५ लाभार्थ्यांपैकी १२ लाख ५१ हजार ७३३ लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड वितरित करण्यात आले असुन उर्वरित कार्डधारकांची नोंदणी करुन कार्ड वितरणाची कार्यवाही सुरु असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
बैठकीस आरोग्य विभागाचे अधिकारी व जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close