shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्ञानाच्या अथांग सागरास महापरिनिर्वाण दिनी श्रीरामपूरात विनम्र अभिवादन


श्रीरामपूर प्रतिनिधी : 
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परिवर्तन फाऊंडेशनच्यावतीने शहरातील रेल्वे स्टेशन जवळील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

विश्वरत्न, भारतरत्न ,प्रज्ञा सूर्य, क्रांतीसुर्य,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,उद्धार करते, महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे वादळ (६ डिसेंबर १९५६ रोजी) शांत झाले त्यास आज ६७ वर्ष झाली.

भारतीय राजकारणातील आयुष्यभर उन्हात उभे राहून तमाम दिन दलित उपेक्षित आणि दुर्लक्षितांना मायेची सावली देणारी कोट्यावधी दलितांची माऊली त्यांना पोरके सोडून निघून गेली, परंतु जातांना भारताला राज्यघटना आणि अशोक चक्राची देणगी देऊन गेली. धर्म नसलेल्या माणसांना धम्म देऊन गेली, आयुष्यभर  संघर्ष करून मिळवून दिलेल्या अधिकाराचे जतन करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची मांडणी करून गेली, बुध्द आणि त्यांचा धम्म या ऐतिहासिक ग्रंथाला पुनरत्व देऊनच आपल्या ऐहिक जीवनाची समाप्ती केली, त्याला आज ६७ वर्ष झाले.त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परिवर्तन फाऊंडेशनच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी फाऊंडेशनचे अध्यक्ष उत्तमराव दाभाडे, बी.बी. खंडीझोड, मेजर कृष्णा सरदार, रमेश अंभोरे, गोरख आढाव, डॉ. नरवडे, बाळासाहेब अमोलीक, न्यू  इंडिया इन्शुरन्स कंपनीचे बी. एम.भोसले, विशाल नरवडे, रामदास पवार, श्रीराम ट्रेडर्सचे मालक रामचंद्र सुगुर इत्यादी उपस्थित होते.

*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close