सौरभ कामडी - पालघर
विकसित भारत संकल्प यात्रा जिल्हा परिषद पालघर,पंचायत समिती जव्हार,ग्रुप ग्रामपंचायत कौलाळे या गावी, शिवमंदिर सभामंडप याठिकाणी
मंगळवार दि.१२ डिसेंबर २०२३ रोजी मोठ्या उत्सवात पार पडला जव्हार तालुक्यातील कौलाळे, झाप,येथे विकसित भारत संकल्प यात्रा सुरवात झाली असून आपला संकल्प विकसित भारत, अंतर्गत विकसित भारत संकल्प यात्रेचा जव्हार तालुक्यातील यात्रेचा शुभारंभ कौलाळे व झाप ग्रामपंचायतीपासून सुरुवात झाली आहे ,ही यात्रा संपूर्ण तालुक्यात फिरणार आहे.
भारत सरकार व राज्य सरकार मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, सर्वच क्षेत्रातील योजना या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात, प्रत्येक नागरीकास या योजनेची माहिती व्हावी व जास्तीत जास्त लोकांनी या योजनांचा लाभ व्हाव्या या उद्देशाने या यात्रेची सुरवात करण्यात आलेली आहे.
सदर शुभारंभ प्रसंगी सर्वच विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते. यावेळी लाभार्थ्यांना जाग्यावरच लाभांचे वाटपही करण्यात आले.आरोग्य विभागा मार्फत अनेक लाभार्थीना प्रधानमंत्री आरोग्य कार्ड योजना, उज्वला गॅस योजना, इतर सर्व योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. यात आयुष्यमान भारत कार्ड, आरोग्य कार्ड, या योजनेच्या लाभार्थ्यांचा ५००००० रु. पर्यंतचा दवाखाण्याच्या खर्च हा शासनमार्फत केला जाणार आहे. विकसित भारत संकल्प यात्रा या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत औक्षण तारपा नृत्यांनी करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ.हेमंत विष्णू सवरा, सभापती सौ. विजया लहारे, ग्रामपंचायत झाप सरपंच एकनाथ दरोडा, दयानंद लहारे, माळी साहेब, साकुर ( phc ) वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी आदि उपस्थित होते. तसेच ग्रुप ग्रामपंचायत कौलाळे सरपंच सौ. वैशाली धोडी, ग्रामसेवक उबाळे, उपसरपंच शंकर मेढा, पत्रकार प्रमोद मौळे, महेश पाटील समाजिक कार्यकर्ते, सदस्य प्रदीप निकुळे, योगेश कचरे, वंदना ठोमरे, अंजली दिघा, सोनी मुरथडे, माजी सरपंच केशव घाणे, अशोक धोडी, शुभाष मुरथडे उमेद संस्थेचे crp, आशा कार्यकर्त्या सहभागी होत्या.
तसेचं सर्व ग्रामस्थांच्या उपस्थित विकसित भारत संकल्प यात्रा या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
*सौरभ कामडी - पालघर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

