shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर इंडियन मेडिकल असोसिएशन शाखेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान.

इंदापूर इंडियन मेडिकल असोसिएशन शाखेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान.

 तर गेल्या महिन्यातच  ४ राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले होते.
इंदापूर : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या "आओ गाव  चले उपक्रमांतर्गत दत्तक गाव पंधारवाडीमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर शाखेच्या वतीने राबवण्यात आलेल्या मोफत आरोग्य सेवा व इतर आरोग्य सेवा
व इतर आरोग्य विषयक उपक्रमाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. त्यानुसार यावर्षीचा विशेष राष्ट्रीय पुरस्कार आय एम ए इंदापूर शाखेला जाहीर झाला.

 केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम येथे दि. २७ डिसेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या आय. एम. ए राष्ट्रीय परिषदेत हा पुरस्कार इंदापूर शाखेच्या वतीने अध्यक्षा डॉ. कल्पना खाडे व सचिव डॉ. प्रतिभा वनवे यांना प्रदान करण्यात आला.
 यापूर्वी दि.२५ नोव्हेंबर रोजी अमरावती येथील आय एम ए डॉक्टरांच्या परिषदेमध्ये ४ राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले होते.आओ गाव  चले उपक्रमांतर्गत  आय एम ए इंदापूर शाखेच्या वतीने दत्तक गाव पंधारवाडी येथे विविध लोकोपयोगी व आरोग्य विषयक उपक्रम राबवण्यात आले.

 यात सर्व रोग निदान शिबिर, कॅन्सर तपासणी व उपचार, आरोग्य विषयक जनजागृती, व्याख्याने, व्यसनमुक्ती कार्य, कार्यशाळा, नेत्र तपासणी व उपचार यासारख्या विविध उपक्रमांचा समावेश होता. या सर्व कार्यक्रमाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली व त्याबद्दल विशेष पुरस्कार आय एम ए च्या राष्ट्रीय परिषदेमध्ये देण्यात आला. याबद्दल आय एम ए पदाधिकारी व सहभागी सर्व डॉक्टरांवर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.

 आय एम ए इंदापूरचे मार्गदर्शक डॉ. राम अरणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व डॉक्टरांनी मनापासून सहकार्य केल्यामुळे हा पुरस्कार मिळाल्याचे डॉ कल्पना खाडे व डॉक्टर प्रतिभा वनवे यांनी सांगितले व त्याबद्दल सर्व डॉक्टरांचे आभार मानले. भविष्यात आय एम ए मार्फत पंधारवाडी व इतर गावांमध्ये आय एम ए च्या माध्यमातून विविध आरोग्य विषयक उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. कल्पना खाडे यांनी दिली.

फोटो ओळ : इंदापूर इंडियन मेडिकल असोसिएशनचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार स्वीकारताना मान्यवर
close