shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवनिर्वाचित ग्रा.पं.सदस्यांचा १० डिसेंबर रोजी ना. राधाकृष्ण विखे पा.यांच्या हस्ते सत्कार


शिरसगांव प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील तिरंगी लढतीत ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गणेशराव मुदगुले यांच्या गटास बहुमत मिळाल्याने शिरसगांव ग्रामपंचायत सत्ता जिंकली आहे.

त्यामुळे नवनिर्वाचित लोकनियुक्त  सरपंच राणी वाघमारे,उपसरपंच संजय (मुन्ना) यादव व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्या हस्ते शिरसगांव येथे दि.१० डिसेंबर रोजी दुपारी २ वा.शिरसगांव येथील श्री विठ्ठल मंदिरासमोर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांस अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी शिरसगांव ग्रामस्थानी, सर्व सदस्यांनी सत्कार समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन गणेशराव मुदगुले, सरपंच राणी वाघमारे, उपसरपंच संजय यादव, ग्रामसेवक पी.डी. दर्शने, सर्व ग्रा. प. सदस्य व ग्रामस्थ यांनी केले आहे.

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
close