shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महंत ब्रीजलालदादा पंजाबी यांनी धर्मसेवा आणि समाजसेवेचा आदर्श निर्माण केला-पोपटराव आदिक

श्रीरामपूर प्रतिनिधी:
महानुभाव संप्रदाय म्हणजे महान जीवनानुभव आणि सेवाभावाचा आदर्श होय  याच जीवनमूल्यांची वाटचाल करणारे श्रीरामपूरमधील नेवासा रोडवरील श्रीकृष्ण मंदिराचे प्रमुख प पू.प. महंत ब्रीजलालदादा पंजाबी यांनी धर्मसेवा आणि समाजसेवा विचारांचा आदर्श निर्माण केला,त्यांच्या कार्याची लोकप्रियता सर्व समाजात आहे. त्यांचे व्यक्तित्व आणि सेवातत्व श्रीरामपुकरांना  भूषणावह असल्याचे मत श्रीरामपूर एस.टी.आगाराचे सेवानिवृत्त प्रमुख पोपटराव आदिक यांनी व्यक्त केले.


   श्रीरामपूर नेवासा रोडवरील महानुभाव श्रीकृष्ण मंदिर आणि आश्रम येथे वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे 'महानुभाव संप्रदाय आणि सेवाभावाचा आदर्श 'या विषयावर आयोजित परिसंवादात प्रमुख पाहुणे म्हणून पोपटराव आदिक बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी.ई.शेळके होते. मंदिरातील व्यवस्थापक-श्रीगोविंदबाबा आणि श्रीविशालबाबा यांनी नियोजन केले.वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला.महानुभाव संप्रदाय आणि पाच परमेश्वर यांची महती सांगून :आमचे अण्णा ', 'महंत ब्रीजलालदादा 'ह्या कविता सादर केल्या. पोपटराव आदिक आपल्या भाषणात पुढे म्हणाले, श्रीकृष्ण मंदिराचे प्रमुख परमपूज्य परम  महंत ब्रीजलालदादा पंजाबी यांनी वयाच्या सहात्तर वर्षात महानुभाव धर्म,सेवाभाव जपताना मराठी साहित्य,लेखक,कवी आणि संस्कृतीची जोपासना केली, तो आदर्श पुढील वाटचालीत जपला पाहिजे असे सांगून पोपटराव आदिक यांनी १९९० पासून महंत ब्रीजलालादादा पंजाबी यांच्या आठवणी सांगितल्या.

यावेळी माजी प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे यांनी गीतेतील पंधरावा अध्याय वाचून त्याचे विश्लेषण केले. माणसाचे जीवन अनमोल आहे. जन्म -जीवन आणि मृत्यू यांचे महत्व ओळखले पाहिजे. याप्रसंगी ज्ञानेश्वर मुरकुटे,माजी प्राचार्य किसनराव वमने, माजी प्राचार्य के. एस. काळे, माजी मुख्याध्यापक भागवतराव मुठे पाटील,विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे आदिंनी परिसंवादात आपली मते व्यक्त करून श्रीरामपूर मधील महंत ब्रीजलाल पंजाबी यांनी श्रीकृष्ण भक्ती आणि महानुभाव संप्रदायाला लोकाभिमुख बनविले.प्राचार्य शेळके यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, श्रीरामपूरमधील श्रीकृष्ण मंदिर हे साहित्य, साहित्यिक आणि विचारवंत यांचे आदरस्थान आणि विचार व्यासपीठ बनले.अनेक उपक्रमामुळे विचारवंत, अभ्यासक, शिष्यवर्ग, युवक, विद्यार्थी यांना प्रेरणादायी ठरले, त्या उपक्रमाचे श्रेय    महंत ब्रीजलालदादा  पंजाबी यांना दिले पाहिजे, साहित्यिक शिवाजी सावंत, अड, रावसाहेब शिंदे,माजी आमदार जयंतराव ससाणे,भाऊसाहेब कांबळे, रामायणाचार्य अरुणनाथगिरी महाराज,प्राचार्य डॉ.पांडुरंग गायकवाड, समीक्षक डॉ. शिवाजी काळे, संमोहनतज्ज्ञ डॉ. रामकृष्ण जगताप, प्रा.कवी पोपटराव पटारे  तसेच अनेक महानुभावीय अभ्यासक  आदींची अभ्यासपूर्ण व्याख्याने, परिसंवाद, साहित्य संमेलने संपन्न झाली. 

डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या अनेक पुस्तकांचा प्रकाशन सोहळा झाला.अशा आठवणी सांगून महंत ब्रीजलालदादा पंजाबी हे संतत्व आणि माणुसकीचे ममत्व जपणारे व्यक्तित्व होते असे सांगितले. ताराताई पवार,शोभाताई आदिक, महंत शिवराजबाबा विद्वांस, म.कृष्णराजबाबा लोणारकर,   म.रविराजबाबा, विशाल पवार, शुभम पवार, नंदा पावसे, सत्यभामा पंढरीनाथ चव्हाणके, छबूबाई दत्तू डावरे, मुक्ताराम वाकचौरे, आकाश मराठे, भाऊसाहेब खरात, रावसाहेब वाकचौरे, अशोक कापकर,मंदाताई बिबवे, सुगन्धा डोंगरे, आश्रमातील महानुभावीय  तपस्विनी चंद्रकलाअक्का, मनोरमाताई, शकुताई, शैलाताई, स्वातीताई, विद्याताई, सोनिया आणि शिष्य परिवाराने नियोजनात भाग घेतला. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी करून आभार मानले.


*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close