shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

थँलेसिमीया रुग्णासाठी अशोक पाॕलिटेक्निक महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न


श्रीरामपूर प्रतिनिधी:
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अशोकनगर येथील अशोक पॉलीटेक्नीक महाविद्यालयात थँलेसिमीया रुग्णासाठी रक्तदान शिबिर  संपन्न झाले.

           या रक्तदान शिबिरासाठी छ. संभाजीनगर येथील सत्य साई रक्त केंद्र या संस्थेचे अरूण वाकडीकर यांनी सांगितले की, बीटा थॅलेसेमिया मेजर या व्याधीग्रस्तांना जगण्यासाठी तरी नियमितपणे रक्त देण्याची गरज असते. दर ४ ते ६ आठवड्यांनी त्यांना रक्त मिळायलास हवे. अशाप्रकारे नियमित रक्त न मिळाल्यास हे रुग्ण जगत नाहीत. त्यांना जंतुसंसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे काविळीसारखे आजार होणार नाहीत याची काळजी घ्यावी. या रुग्णांना रक्त नियमित मिळाल्यास ते प्रौढावस्थेपर्यंत जगू शकतात. यातून व्याधीमुक्त होण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लँट हा एकमेव उपाय सध्या आहे. थॅलेसेम‌यिा बीटा मेजर ही व्याधी रुग्णालाच नाही, तर कुटुंबियांनाही थकविणारी असते. त्यामुळे पूर्ण उपचारात कुटुंबियांनी रुग्णांना आधार देणे व संयम राखणे खूप गरजेचे आहे.
           यावेळी युवा नेते निरज मुरकुटे यांनी देखील रक्तदान केले. तसेच युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, अशोक कारखान्याच्या संचालिका सौ. मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. याप्रसंगी सई मुरकुटे, श्री सत्य साई ब्लड सेंटरचे अरुण वाकडीकर, किरण चंदेल, चरणसिंग चव्हाण, कांचन सावरकर, नंदु बर्डे, चेतन सूर्यवंशी, अंकुश मोकळे तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. या शिबिरासाठी ज्ञानेश्वर त्रिभुवन, शाहरुख पठाण, राजेंद्र देवकर, जब्बार पठाण, गणेश काळे, अंबादास पवार, संदीप त्रिभुवन  यांनी परिश्रम घेतले आहे.

*पत्रकार इम्रान एस.शेख - श्रीरामपूर
*सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
*9561174111
close