प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
उल्हासनगर येथील जे.वाटुमल साधुबेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत माळी यांची मुंबई विद्यापीठाच्या वनस्पती शास्त्र अभ्यास मंडळाच्या चेअरमनपदी निवड झाली आहे.
त्यांची या पुर्वीच मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर प्राचार्य गटातुन सदस्य म्हणून ही निवड झालेली आहे.
डॉ.वसंत माळी यांनी आपल्या अध्यापनाची सुरूवात बीड जिल्ह्यातील कडा येथील आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख म्हणून केली.ते या महाविद्यालयात जुन 1992 ते 2016 पर्यंत कार्यरत होते.2016 पासुन ते जे.वाटुमल साधुबेला महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी निवड झाली होती.
डॉ.माळी यांनी या महाविद्यालयाचा शैक्षणिक आलेख वाढवून अगदी थोड्याच कालावधीत आपल्या शैक्षणिक संशोधनातून वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय परिषदामधुन वनस्पती शास्त्र विषयात विद्यार्थी व संशोधकांना मार्गदर्शन केले आहे.
त्यांच्या या योगदानाबद्दल मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर प्राचार्य गटातुन या पुर्वीच निवड झाली आहे.दुग्ध शर्करायोग म्हणजे याच विद्यापीठाच्या वनस्पती शास्त्र विषय अभ्यासक्रम मंडळाच्या चेअरमनपदी ही सर्वानुमते निवड झाली हे विशेष होय.
डॉ.वस़त पंडीत माळी यांच्या या यशाबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रविद्र कुलकर्णी,प्रभारी कुलगुरू डॉ.अजय भामरे, साधुबेला एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माजी खासदार उत्तम सिंग पवार, सचिव नितीन बागवे, माजी आ
मदार भीमराव धोंडे ,माजी प्रभारी कुलगुरू डॉ.नरेश चंद्र, माजी कुलसचिव .प्राचार्य डॉ.एम.एस. कुऱ्हाडे, प्राचार्य डॉ.गडदे, प्राचार्य डॉ. शिवारे, प्राचार्य डॉ.दिलीप पाटील, प्राचार्य डॉ.भगुरे , प्राचार्य डॉ.किशोरी भगत, प्राध्यापक डॉ. शिवराम गर्जे,(अधिष्ठाता , विज्ञान ) ,प्रा. डॉ. नितु पुरसवाणी, डॉ.दत्तात्रय कालबांडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


