शिर्डी शहरात दिव्यांग व्यक्तींना हक्काचे सुसज्ज सभागृह बांधून देणार - मुख्याधिकारी सतीश दिघे
राजेंद्र बनकर / शिर्डी
शिर्डी येथील विश्वकर्मा मंदिरात
जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला आहे. यावेळी शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे,दिव्यांग क्रांती संस्थेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दिलीप दिघे, कोकण विभाग प्रमुख सुरेश मोकल, प्रहार दिव्यांग क्रांतीचे जिल्हाध्यक्ष ॲड लक्ष्मण पोकळे , उत्तर नगरजिल्हा अध्यक्ष मधुकर घाडगे , जिल्हा संपर्क प्रमुख नितीन चौधरी, महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मीताई देशमुख , तालुका अध्यक्ष अश्विनीताई विखे , राहाता तालुका अध्यक्ष नितिन भनसाळी , कार्याध्यक्ष भावनाथ गमे , प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष विकी मिसार आदीसह प्रहार क्रांती दिव्यांग क्रांती संस्थेचे शिर्डी शहर अध्यक्ष कैलास यादगुडे , उपाध्यक्ष सुनिल आरणे , सचिव ताहिर सय्यद , कार्याध्यक्ष संतोष वाघमारे , संघटक सुरेश गुगळे , उप कार्याध्यक्ष चंद्रशेखर रॉय , सल्लागार खुशाल पठाण , शांताराम धोञे , गौतम घनघव , नानासाहेब शिरसाट , अमोल गांगुर्डे आदीसह सदस्य उपस्थित होते यावेळी मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी दिव्यांग व्यक्तीसाठी प्रशासन नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करत असुन मुळातच या दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुळ प्रवाहात आणता येईल त्यांना आपण दिव्यांग असल्याची भावना नष्ट होईल यासाठी मोठे प्रयत्न होत असुन शिर्डी नगरपरिषद ही नेहमी दिव्यांग व्यक्तीच्या समस्या जाणून घेत त्यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याचे स्पष्ट केले. तर शिर्डी शहरात दिव्यांग व्यक्तीसाठी भव्य अशा बैठक हॉलचे आपण निर्माण करणार असुन यामुळे सर्व दिव्यांग व्यक्तींना आपले विचार आचार देवाणघेवाण व बैठकी , सामाजिक कार्यक्रम घेण्यासाठी स्वताचे व्यासपीठ उपलब्ध होईल यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले,
शिर्डी शहरात साधारणतः दोनशे दिव्यांग व्यक्ती असुन त्यांनी शासकीय बचतगटात सहभागी व्हावे जेणेकरुन त्यांना शासकीय योजनांचा लाभ देता येईल असेही यावेळी दिघे यांनी स्पष्ट केले. तर शहरात दिव्यांग व्यक्तीच्या रोजगारासाठी शिर्डी नगरपरिषद नेहमीच सहकार्य करत असुन लवकरच दिव्यांग व्यक्तींना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देत असल्याचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी स्पष्ट केले.
यावेळी दिव्यांग क्रांती संस्थेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दिलीप दिघे , कोकण विभाग प्रमुख सुरेश मोकल यांनी शिर्डी शहराला कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी लाभले असुन दिव्यांग व्यक्तीसाठी त्यांनी दाखवलेला पुढाकार हा कौतुकास्पद असुन आज खरोखर दिव्यांग बांधवाची दिवाळी साजरी होत असल्याचे स्पष्ट केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे शिर्डी शहर अध्यक्ष कैलास यादगुडे यांनी आभार व्यक्त करत त्यांचा सत्कार केला.
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

