shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गौराईमळा शाळेत भरला आनंदी बाजार. नऊ हजाराहून अधिक रकमेची उलाढाल.*

*गौराईमळा शाळेत भरला आनंदी बाजार. नऊ हजाराहून अधिक रकमेची उलाढाल.*

*मकर संक्रांत सणाच्या खरेदीसाठी पालकांची लगबग*
    इंदापूर प्रतिनिधी: दि १३ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौराईमळा येथे मुलांना व्यवहारज्ञान कळावे व स्वतःच्या शेतातील भाजीपाला कसा विकावा या हेतूने आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या बाजाराचे उद्घाटन केंद्र प्रमुख सुपुते साहेब ग्रामपंचायत शेळगाव उपसरपंच   सौ. रेश्माताई  जाधव,ग्रामपंचायत सदस्य अश्र्विनिताई  शिंगाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल नाझरकर व सदस्य अरुण जाधव सर इतर सदस्य यांचे हस्ते करण्यात आले.
           मेथी, पेरू, घेवडा, चाकवत, बोरे, ऊस,भेळ, पाणी पुरी मिसळ पाव ,पोहे, बिर्याणी अशा सर्व प्रकारची मेनु उपलब्ध होते त्याचप्रमाणे शालेय स्टेशनरी साहित्य, वडापावचे स्टॉल मुलांनी लावले होते. महिला पालक, ग्रामस्थ यांनी खरेदीसाठी गर्दी केली. यावेळी बाजारात एकूण नऊ  हजार रुपयापर्यंत उलाढाल झाली.
        यावेळी शाळा व्य समितीचे उपाध्यक्ष अमोल जाधव,तात्यासाहेब शिंगाडे , शामराव जाधव,विलास शिंगाडे ,पद्मराज जाधव,  प्रविण जाधव , संजय वायसे, कैलास शिंगाडे , जयसिंग जाधव, विशाल शिंगाडे ,श्रावणकुमार जाधव, राजु शेख ,  अमोल पवार मुख्याध्यापक शेळगाव   उमेश सुपुते सर ,पैंगबर शेख सर ,संतोष हेगडे  सर तसेच महिला आश्विनी शिंगाडे , प्रियांका जाधव, रंजना बनसोडे पुनम जाधव ,रेश्मा जाधव, रेश्मा शेख, सायरा शेख , पुजा पवार, मनिषा शिंगाडे,सारिका शिंगाडे विद्या शिंगाडे  ऋषाली शिंगाडे ,आशा होले ,कोमल जाधवउपस्थित होते. यावेळी बहुसंख्येने पुरुष व महिला वर्ग उपस्थितीत राहुन मुलांचा आनंद व्दिगुणित केला .बाजाराचे नियोजन मुख्याध्यापक प्रताप शिरसट, जुबेदा पठाण मॅडम यांनी केले.
close