shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अनंतराव पवार विद्यालयात उपजिल्हाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल सागर मुळीक यांचा सत्कार.

अनंतराव पवार विद्यालयात उपजिल्हाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल सागर  मुळीक यांचा सत्कार.
 बावडा: निर -  निमगाव (ता. इंदापूर) येथील अनंतराव पवार विद्यालयाचे २००९ सालीच्या इयत्ता दहावीतील र्विद्यार्थी सागर धनाजी मुळीक रा. भगतवाडी यांनी नुकत्याच दि. १८ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या २०२२ मध्ये देण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षेच्या निकालात उपजिल्हाधिकारी पदी महाराष्ट्रात सतराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्याबद्दल तसेच बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर पदी निवड झाल्याबद्दल माजी विद्यार्थी प्रमोद वनवे यांच्या मातोश्री सौ भामाबाई वनवे, अतुल लाळगे यांच्या मातोश्री श्रीमती संगीता लाळगे यांचा आनंतराव पवार विद्यालय निर-  निमगाव यांच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय घोगरे ,विश्वस्त शोभा घोगरे ,  सचिव अजित घोगरे,धनाजी मुळीक , लता मुळीक तसेच नीर निमगाव सोसायटीचे चेअरमन अण्णा पवार, मुख्याध्यापक बाळासाहेब गरगडे, माजी चेअरमन दीपक गरगडे, भीमराव गरगडे, प्रताप देवडे तसेच सचिन पवार ,कुमार सावळकर, अंकुश सावळकर, शाहरुख मुलांनी ,सुंदर पवार ,राहुल देवडे ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

यावेळी सागर मुळीक यांनी आपले मनोगत व्यक्त म्हणाले की, माझ्या या यशामध्ये माझ्या आई-वडील याच्याबरोबर माझ्या शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचाही मोठा सहभाग असून माझा हा सन्मान माझ्या शाळेत झाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले.

केले तर मुख्याध्यापक बाळासाहेब गरगडे संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय घोगरे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपजिल्हा अधिकारी पदी गवसणी घालणारे या शाळेचे विद्यार्थी सागर मुळीक यांनी  स्वतः बरोबर आई-वडील व शाळेचे नाव लौकिक केले. त्यांच्या या यशाची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये यश गाठले पाहिजे अशा शब्दात विद्यार्थ्यांना यावेळी त्यांनी आवाहन केले व मुळीक यांचे अभिनंदन केले.
यावेळी मुख्याध्यापक गरगडे यांनी त्यांच्या यशा बद्दल आणि गुणकार्याबद्दल कौतुक केले. त्यांच्या या यशाबद्दल आम्हा सर्व शिक्षक व संस्था पदाधिकाऱ्यांना अभिमान वाटतो अशा शब्दात त्यांनी मत व्यक्त केले.
यावेळी दीपक गरगडे यांनी शुभेच्छा दिल्या तर बाळासाहेब मोरे सर यांनी सूत्रसंचालन केले व श्यामराज  डोळे सर यांनी आभार मानले.
close