shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्व:विकासासाठी स्वतःला वेळ द्या- प्रा. वीरेश होळकुंडे श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न.

स्व:विकासासाठी स्वतःला वेळ द्या- प्रा. वीरेश होळकुंडे 

श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न. 
 बावडा: श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा, विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर येथील प्रा. विरेश होळकुंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रा. विरेश होळकुंदे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की केवळ बाह्य सौंदर्य म्हणजे व्यक्तिमत्व नसून आंतरिक व बाह्य सौंदर्य म्हणजे व्यक्तिमत्व होय. व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी आणि आंतरबाह्य सौंदर्य विकसित करण्यासाठी वेळेचे नियोजन, बौद्धिक कौशल्य आणि आंतरिक ऊर्जेची आवश्यकता असते. स्पर्धेचे युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी स्वतःचा विकास करणे आवश्यक आहे त्यासाठी ध्यानधारणा मेडिटेशन योग्य आहार आपल्यातल्या पॉझिटिव्ह एनर्जी ओळखून विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत आपले गुणवत्तापूर्ण व्यक्तित्व निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.लहू वावरे हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाठी स्वतःला वेळ द्यावा तसेच नेहमी सकारात्मक बाजूने विचार करावा व्यक्तिमत्व विकास करताना विद्यार्थ्यांनी विविध पैलूचा कसा विकास करावा याविषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख प्रा. प्रवीण घोगरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनल सुतार हिने केले व आभार डॉ. तायाजी लोंढे यांनी मानले सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
-------------------------------------
फोटो ओळ:श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा. वीरेश होळकुंडे.
close