shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अशोक आयडीअल स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

स्कूलची उत्तरोत्तर होणारी प्रगती
 कौतुकास्पद - डॉ.प्रमोद गाडे

श्रीरामपूर प्रतिनिधी:
अशोक आयडीअल स्कूलने माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली उत्तरोत्तर केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. या स्कूलमुळे ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्ध झाली आहे असे प्रतिपादन स्ञीरोग तज्ञ डॉ.प्रमोद गाडे यांनी केले.
तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक आयडीअल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले. डॉ. प्रमोद उंडे व ॲड.रुषीकेश बोर्डे  प्रमुख अतिथी होते. यावेळी कारखाना व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, संचालक  सोपानराव राऊत, हिंमराव धुमाळ, बाबासाहेब आदिक, माजी व्हा.चेअरमन बाबासाहेब काळे, ॲड.सुभाष चौधरी, माजी सभापती डॉ. सुनिताताई गायकवाड,भाऊसाहेब उंडे, आदिनाथ झुराळे, विरेश गलांडे, ज्ञानेश्वर काळे, अच्युत बडाख, हरिदास वेताळ, बाजार समिती संचालक सोन्याबापू शिंदे, दत्ताञय झुराळे, गणेश छल्लारे, प्राचार्य अंजाबापू शिंदे, प्राचार्य प्रसाद कोते, प्राचार्य संपत देसाई आदि उपस्थित होते.

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका व अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्रीताई मुरकुटे आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाल्या की, अशोक आयडियल स्कूलने माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली दहा वर्षात महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. केवळ ६० इतक्या विद्यार्थी संख्येपासून सुरू झालेल्या स्कूलमध्ये सध्या पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीकरिता कला, क्रीडा, सांस्कृतिक, व्यक्तीमत्व विकासाचे विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांना आधुनिक पध्दतीने शिक्षण दिले जाते. स्कूलमध्ये डीजीटल एज्युकेशन साधने, कम्पुटर लॅब, लॕग्वेज लॕब, सुविधायुक्त वाचनालय, क्रिडांगण, स्कूल बसेस अशा सुविधा देण्यात येतात. अशोक आयडियल स्कूलचे प्राचार्य रईस शेख यांनी स्कूलचा वार्षिक अहवाल सादर केला. श्रीरामपूरचे प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.प्रमोद गाडे यांनी आपल्या भाषणात स्कूलची होणारी उत्तरोत्तर प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत तालुका, जिल्हा तसेच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर यशस्वी विद्यार्थी खेळाडूंचे कौतुक केले. तसेच जयवंत उंडे या अशोक आयडियल स्कूलच्या विद्यार्थ्याने सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल त्याचा सत्कार करण्यात आला तसेच विद्यालयातून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण रोहित वमने व तृतीय कु.श्रावणी कासार यांचा देखील या प्रसंगी सन्मान करण्यात आला. अॕड.ऋषिकेश बोर्डे यांनी आपल्या भाषणात स्कूलच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
        कार्यक्रम प्रसंगी परितोषिकांचे वितरण करण्यात आले. नुकताच तालुका पातळीवर विजयी ठरलेला १४ वर्षाखालील मुलांचा व्हॉलीबॉल संघ यास ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच तालुका पातळीवर मुलींचा संघ उपविजेता ठरल्याने त्या संघाचा देखील ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. या वर्षीचा स्टुडंट ऑफ द इयर(बॉईज) हा सन्मान चि.श्रेयांश अभिजित पटारे यास देण्यात आला. तसेच स्टुडंट ऑफ द इयर (गर्ल) कु. दिशा अविनाश आरोटे या विद्यार्थिनीस देण्यात आला. त्याच प्रमाणे या वर्षीचा प्लेयर ऑफ द इयर (बॉईज) कृष्णा देसाई आणि प्लेयर ऑफ द इयर (गर्ल)प्रिया गायधने या दोघांना प्रदान करण्यात आला. इंटरहाउस स्पर्धेमध्ये स्पोर्ट हाऊस म्हणून गॅलिलिओ हाऊस व कॉक हाऊस म्हणून गॅलिलिओ हाऊस नेच मान पटकावला.
महात्मा गांधी हिंदी राजभाषा प्रचार संस्था द्वारा हिंदी विषयाचे शिक्षक युसुफ सय्यद तसेच मनिषा त्रिभुवन यांचा प्रशस्तीपत्रक देवून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रा. रूपाली देशमुख यांनी अतिथी परिचय करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील बागुल व वनमाला गरुड यांनी केले. अध्यक्षीय सूचना आरती डेरी यांनी मांडली तर अनुमोदन वृषाली बकरे यांनी दिले. आभार रोमा भाटिया यांनी मानले.

पत्रकार राजु मिर्जा
(ब्यूरो चिफ: नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
close