shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देहरे येथे अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या ...

नगर / प्रतिनिधी

देहरे : १७ /    कु. साक्षी तुकाराम पिटेकर वय १३ वर्षे दि. १३/०१/२०२४ रोजी दुपारी ०३:०० वा.  तिचे राहते घरामधुन कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारण करीता पळुन नेले म्हणुन साक्षीची आई सुवर्णा हिने दिलेले फिर्यादी वरुन एम आय डी सी पो स्टे ला गु र नं २५/२०२३ भादंविक ३६३ प्रमाणे गुन्हा दि. १४/०१/२०२४ रोजी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर  सर्व नातेवाईक व पोलीस असे सर्व  साक्षी हिचा शोध घेत होते.
त्यादरम्यान आज दि. १६/०१/२०२३ रोजी सकाळी ०९:०० वा. पोउपनिरी श्री हंडाळ यांनी त्यांचे मोबाईलवरुन फोन वरुन सांगितले की, एका मुलीचे प्रेत देहरे येथील शेतकरी बंगेचे विहरीत मिळुन आलेले असून ती तुमची कु.साक्षीआहे काय ? असे साक्षीचे मामा दीपक धनवटे यांना विचारण्यात आले. याबाबत खात्री करणेसाठी या असा निरोप आल्याने दिपक धनवटे तात्काळ देहरे येथे स्टॅन्डवर पोहचले तोपर्यंत  एका मुलीचे प्रेत तेथे आणल्याचे‌दिसले.  तेव्हा साक्षीचे मामा दिपकने  खात्री केली असता सदरचे प्रेत हे माझी भाची कु. साक्षी तुकाराम पिटेकर, वय १३ वर्षे हिचेच आहे असे पोलिसांना सांगितले. तिचे डोक्याचे पाठीमागे, दोन्ही पायाचे मांडीवर गंभीर जखमा दिसत होत्या, तिचे चेहऱ्यावर व हातावर नखाने ओरबडलेल्या सारख्या खुना दिसत होत्या. साक्षी हिचे दाताखाली तिचा ओठ आलेला दिसत होता. त्यानंतर तिला सिव्हील हॉस्पीटल, अहमदनगर येथे पाठविले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषीत केले.

 दि.१३जानेवारीला साक्षी हिला तिचे राहते घरातून कोणीतरी आरोपीने पळून नेल्यानंतर दिपक धनवटे यांनी तिचा शोध घेत असतांना असे समजले होते की, कु. प्रिती बाबा जाधव, रा. जाधव वस्ती, देहरे, ता. जि. अहमदनगर हिचे गोटया उर्फ ऋत्वीक संजय जाधव, रा. जाधव वस्ती, देहरे, ता. जि. अहमदनगर याचे बरोबर खुप वर्षा पासून प्रेम संबंध होते व ते दोघे पळुन पण गेले होते. माझी भाची साक्षी व गोटया यादोघांना बोलतांना प्रिती हिने कधीतरी पाहिले होते. त्यावरुन दि. १३/०१/२०२४ रोजी दुपारी ०१:०० ते ०२:०० वाजण्याचे दरम्यान देहरे बाजार तळात प्रिती हिने माझी भाची साक्षी हिला विचारले की, तु गोटया बरोबर का बोलते असे विचारुन प्रिती जाधव हिने भाची कु. साक्षी हिस तेथे लाथा बुक्क्यांनी मारहाण केलेली आहे. त्यानंतर प्रिती ही माझी भाची साक्षी हिला जाधव वस्ती कडे घेऊन गेलेले पाहिले. त्याचवेळी तेथुन गोट्या उर्फ ऋत्वीक संजय जाधव हा देखील जाधव वस्ती कडे गेलेले पाहिले. ही सर्व घटना माझा भाचा चि. अथर्व तुकाराम पिटेकर याने समक्ष पाहिलेली आहे.

त्यानंतर गोटया उर्फ ऋत्वीक संजय जाधव याने माझी भाची साक्षी तुकाराम पिटेकर हिचे अंगाशी लगड करुन तिस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन त्याने व प्रिती बाबा जाधव या दोघांनी मिळुन साक्षी हिस कोणत्यातरी हत्याराचे साहयाने डोक्यात पाठीमागुन वार करुन भाची साक्षी हिला पोहता येत नाही हे दोघांना माहिती असतांना देखील तिला बंगेचे विहरीत ढकलुन देऊन तिस जिवंत ठार मारले आहे. तरी त्यांचेवर कारवाई होणेस विनंती आहे.असे साक्षीचे मामा दिपक धनवटे यांनी फिर्याद देताना लिहून दिले आहे.


यावेळी पोलीस उप निरीक्षक चांगदेव हडाळ यांनी समक्ष कळविले की, एम आय डी सी पो. स्टे. अ.नगर गु.र.नं. ०ा 25/2024 भा. दं. वि. कलम 363 प्रमाणे गुन्हयाचे तपासात असतांना दि. 16/01/2024 रोजी 08:40 वाजण्याचे सुमारास भंगेचे विहरीत, देहरे शिवार, ता. जि. अहमदनगर गुन्हयातील अपहृत मुलगी नामे कु. साक्षी तुकाराम पिटेकर, वय 13 वर्षे, 13 दिवस, रा. देहरे ही येथे मृत अवस्थेत मिळुन आली असून तिचेवर इन्क्वेस्ट पंचनामा केला असून तिचे प्रेत पोस्ट मार्टम करीता ससून हॉस्पीटल, पुणे येथे वैदयकीय अधिकारी सो, सिव्हील हॉस्पीटल, अहमदनगर यांनी रेफर केले आहे. सदर घटने बाबत गुन्हयाबाबत साक्षीदार नामे दिपक रामकिसन धनवटे, रा. देहरे यांचे कडे विचारपूस करता त्यांचे सांगणे की, माझी भाची साक्षी व गोठया उर्फ ऋत्वीक संजय जाधव, रा. देहरे या दोघांचे प्रेम संबंध होते त्यातूनच वादविवाद होऊन  दि. 13/01/2024 रोजी दुपारी 01:00 ते 02:00 वा. चे दरम्यान देहरे बाजार तळात प्रिती बाबा जाधव, रा. देहरे हिने माझी भाची साक्षी हिला विचारले की, तु गोटया बरोबर का बोलते असे विचारुन प्रिती जाधव हिने भाची कु. साक्षी हिस लाथा बुक्क्यांनी मारहाण केलेली आहे. त्यानंतर प्रिती ही माझी भाची साक्षी हिला जाधव वस्ती कडे घेऊन गेलेले असून त्या मागे गोटया उर्फ श्रुत्वीक संजय जाधव हा जाधव मळ्या कडे गेलेला आहे. गोटया याने माझी भाची साक्षी तुकाराम पिटेकर हिचे अंगाशी लगड करुन तिस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन त्याने व प्रिती बाबा जाधव या दोघांनी मिळून  कोणत्यातरी हत्याराचे साहयाने डोक्यात पाठीमागून वार करुन भाची साक्षी हिला पोहता येत नाही हे दोघांना माहिती असतांना देखील त्या दोघांनी तिला भंगेचे विहरीत ढकलुन देऊन तिस जिवंत वार मारले आहे. अशी हकिगत सांगितल्याने तसा त्यांचा सविस्तर जबाब नोंदवून १ तो तपासाचे कागदपत्रात सामील करुन गुन्हयास भादंविक 302, 376(2) (ए), 364, 504, 506, 34 सह बालकांचे लैंगिक अत्याचारा पासून संरक्षण कायदा कलम 4, 8, 12 हे वाढीव कलम लावण्यात आले आहे. तसेच सदर गुन्हयात गोटया उर्फ ऋत्वीक संजय जाधव, रा. जाधव वस्ती, देहरे, ता. जि. अहमदनगर व कु. प्रिती बाबा जाचय, रा. जाधव वस्ती, देहरे, ता. जि. अहमदनगर यांना आरोपी म्हणून घोषीत केलेले आहे.
close