shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ब्राह्मण संघर्ष समितीचा जनसंपर्क अभ्यास दौरा १३ जानेवारी पासून सुरू होणार - धनंजय कुलकर्णी!!

प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने मागील अनेक वर्षापासून सातत्याने आंदोलन करत आली आहे यामधे धरणे आंदोलन , मोटार सायकल मोर्चा , पळी ताम्हण वाजवून आंदोलन , लाक्षणीक उपोषण , वेळोवेळी निवेदन देणे , आमरण उपोषण केल्यानंतर परशुराम आर्थिक विकास महामंडळाची घोषणा झाली आहे आता संघर्ष समितीच्या वतीने जनसंपर्क अभ्यास दौरा संपूर्ण महाराष्ट्रात काढण्यात येणार असून याची सुरूवात केज येथुन दि १३ जानेवारी पासून होत आहे अशी माहिती धनंजय कुलकर्णी यांनी दिली . 




समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने सातत्याने आंदोलन केली यामधे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन , केज बीड  १०० कि मी मोटार सायकल मोर्चा , आझाद मैदानावर धरणे आंदोलन , तहसील कार्यालय , आयुक्त कार्यालय समोर पळी ताम्हण वाजवून आंदोलन , लाक्षणीक उपोषण , वेळोवेळी निवेदन दिली  तसेच आमरण उपोषण केली , कोरोना काळात डिजिटली व्हर्चुअली धरणे , कुटुंब नोंदणी अशी उपक्रम ही राबवली व याचा परिणाम म्हणून १४ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस , मंत्री अतुलजी सावे , मंत्री छगनरावजी भुजबळ , मंत्री संदिपानजी भुमरे , मंत्री संजय राठोड , आ. सौ . नमिताताई मुंदडा , आ. मनिषाताई कायंदे , आ. नारायण कुचे यांच्यासह सर्व विभागाचे सचिव व अधिकारी तसेच संघर्ष समितीचे शिष्टमंडळ यांच्या उपस्थिती मधे परशुराम आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली व मंत्री मंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही दिले आहेत तशी प्रक्रिया सुरू झाली आहे . 

समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने ब्राह्मण समाजाच्या मागण्या सरकारकडे लावून धरली म्हणून आ. सौ. नमिताताई मुंदडा यांचा सत्कार करून आभार व्यक्त करून तसेच केज येथील बालाजी मंदिर येथे कार्यक्रम घेऊन संघर्ष समितीचा जनसंपर्क अभ्यास दौरा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात करण्याचा निर्णय समितीच्या वतीने मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे . दि १३ जानेवारी २०२४ रोजी बालाजी मंदिर केज जि बीड येथे सकाळी १० वा कार्यक्रम घेऊन अभ्यास दौरा करणाऱ्या टीम ला अंबाजोगाई , परळी , गंगाखेड , पालम , पुर्णा , परभणी असा पहिला टप्पा होईल सहा ते सात टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रात हा दौरा केला जाणार आहे .  यावेळी बाजीराव धर्माधिकारी परळी वै , धनंजय कुलकर्णी केज , दिपक रणनवरे जालाना , श्रीकांत जोशी अकोला, ॲड राजेंद्र पोतदार वसमत , ॲड प्रज्ञा भिडे मुंबई  , अशोक वाघ जळगाव , इश्वर दिक्षीत बुलढाणा , सौ. विजया कुलकर्णी छत्रपती संभाजी नगार , ॲड भानुदास शौचे , विश्वजीत देशपांडे पुणे , मकरंद कुलकर्णी कोल्हापूर , योगेश जानतीकर लातुर , व्यंकटेश जोशी धाराशीव , महेश अकोलकर अंबाजोगाई , शाम कुलकर्णी गंगाखेड , अनिल दिक्षीत धुळे , प्रविण जोशी पाथरी , लिना दिपोलीकर रत्नागिरी सह आदीनी हा दौरा काढण्याचे सांगितले. 

या जनसंपर्क अभ्यास दौऱ्यात ब्राह्मण समाजाच्या सामाजिक , आर्थिक , शैक्षणिक सर्व परिस्थितीचा अभ्यास करण्यात येणार असुन गावागावातील ब्राह्मण समाजाला कधीही आपण एकटे आहोत , आपल्या साठी कोणीही काही करत नाही अस वाटणार यासाठी तसेच आपण सगळे मिळून एकमेकांना सहकार्य करु ही भावना जागृत करून ब्राह्मण समाजातील प्रत्येकाला आत्मनिर्भर करण्यासाठी व उत्कर्षासाठी एकत्र आहोत हे सांगण्यासाठी व सरकारने लवकरात लवकर परशुराम आर्थिक विकास महामंडळाची प्रक्रिया पुर्ण करून घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाचशे कोटीचा निधी द्यावा यासाठी संघर्ष समिती पाठपुरावा करत असल्याचे अन्यथा ब्राह्मण समाजाला पुन्हा आंदोलनाला तयार रहावे लागेल हे सांगण्यासाठी हि जनसंपर्क अभ्यास दौरा करण्यात येणार आहे . यानंतर विदर्भ व खानदेश दौरा देखील होणार आहे असे धनंजय कुलकर्णी , श्रीनिवास केजकर , श्रीराम शेटे  , श्रीधर खोत , समीर देशपांडे , शिवराज मुथळे , अनंत कोकीळ , राहुल औसेकर  , गणेश कुलकर्णी , किरण कुलकर्णी , उदय कुलकर्णी ,  यांनी माहिती दिली

close