अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
केंद्र शासनाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे. या योजने अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या १७ मार्च, २०२२ व ७ जुलै, २०२३ या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडील ६० टक्के हिस्स्याची रक्कम महाडिबीटी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक, पोस्ट खात्यांमध्ये अशी रक्कम जमा झाली आहे किंवा पुढील काही दिवसांमध्ये जमा होणार आहे, अशा विद्यार्थ्यांनी शासन निर्णयानुसार निर्वाह भत्त्याची रक्कम वजा जाता उर्वरीत रक्कम महाविद्यालयास जमा करावी, असे आवाहन सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

