shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भगवान श्रीराम हे मिश्र आहारी होते हे सत्य आहे, पूर्ण शाकाहार ही हिंदू मध्ये प्रथा नाही :- अजय सिंह सेंगर:- महाराष्ट्र करणी सेना


जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: जगातील सर्वात प्राचीन असा धर्म म्हणजे हिंदू....

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जे उद्गार काढले की भगवान श्रीराम हे पूर्णपणे शाकाहारी नव्हते तर ते मांसाहारी होते. याबाबत सत्य हे आहे की भगवान श्रीराम शाकाहारी व मांसाहारी अर्थात मिश्र आहारी होते.

शाकाहारी  प्रथा हिंदू मध्ये नव्हती,  जैन धर्माच्या उदया नंतर शाकाहारी ही प्रथा निर्माण झाली. जैन धर्माच्या उदया नंतर अनेक हिंदू यांनी हिंसेला त्रस्त होऊन जैन धर्मात प्रवेश केला तिथे अहिंसा व शाकाहारचा अतिरेक बघून अनेक जण परत हिंदू धर्मात वापस आले.

म्हणून आज अनेक हिंदू हे जैन धर्माच्या प्रभावाखाली असल्याने ते स्वतःला शाकाहारी समजतात आणि हिंदू हा शाकाहारी धर्म आहे असे असत्य ते सांगतात.

हिंदू मध्ये बलि प्रथा होती आणि ही प्रथा मंदिरामध्ये प्राण्याची बळी देऊन साजरी केली जात होती. रामायण महाभारतामध्ये सुद्धा काही योद्धाने रक्त पियाले होते. आजही महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आगरी लोक हे रक्ती नावाचे पदार्थ जे रक्ताला गरम करून पेड्यासारखे करतात व खातात.

हिंदूची बलिप्रथा ही नवोदित इस्लाम धर्मांनी स्वीकारली त्यांनी फक्त नाव बदलले बकरी ईद....मुळातच शाकाहारमुळे जैन धर्माचा अस्त होत आहे, संपूर्ण जगात जैन धर्म पंचवीस लाख उरला तर आपल्या देशात जैन धर्माची लोकसंख्या केवळ 20 लाख उरलेली आहे कारण शाकाहारी मुळे लैंगिक शक्ती व प्रजनन क्षमता खालावते हे आपल्या ऋषींना माहिती होते म्हणून त्यांनी बलिप्रथेचे व मासाहारचे समर्थनच केलेले आहे. 

ज्या हिंदूवर जैन धर्माचा प्रचंड असा पगडा आहे अशीच धर्माची ज्ञान नसलेले हिंदू जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करेल.....जितेंद्र आव्हाड यांनी काय फार मोठा शोध लावलेला नाही.

हिंदू हा मिश्र आहारी असा धर्म आहे असे महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यानी प्रतिपादन केले.
close