shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकशाहीचा उत्सव...

        २६ जानेवारी १९५० रोजी आपण लोकशाही प्रजासत्ताक राज्यव्यवस्था स्विकारली. येथू पुढे *राजा हा कोणत्याही राणीच्या पोटी नाही तर मतपेटीतून जन्माला येईल, हे आपण मान्य केले.* एक व्यक्ती एक मत स्विकारण्यापूर्वी आपल्या देशात मनुचा कायदा होता. या मनुच्या कायद्या समाजातील विशिष्ट जातींना विशेष अधिकार बहाल केले होते, त्यांचे विशेष अधिकार आपल्य लोकशाहीने काढून घेतले आणि सर्वांना समान अधिकार प्रदान केले. त्यामुळे दुखावलेल्या / रागवलेल्या आणि भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात कोणत्याही स्वरुपात सहभागी झालेल्या तसेच देशाशी गद्दारी करणाऱ्या त्या विशिष्ट जातवर्गाने आपल्या लोकशाहीबद्दल/आपल राज्यघटनेबद्दल सतत नकारात्मक भूमिका घेतली. लोकशाहीचे सर्व प्रकारचे फायदे घेऊन उलट लोकशाहीलाच मोडीत काढण्याचा सतत प्रयत्न केला आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना ज्यांना या लोकशाहीने सत्ता, संपत्ती प्रतिष्ठा आणि अधिकार दिले आहेत. त्यांनी म्हणजेच आपल्या सारख्या सामाजिक सर्वहारा ( काहिच संपत्ती नसणारा) आर्थिक सर्वहारांनी ही लोकशाही टिकली पाहिजे. एक व्यक्ती एक मत आणि त्यासोबत एक पत मिळाली पाहिजे, यासाठी संघर्ष केला पाहिजे. राजकीय समतेबरोबरच आर्थिक समता प्रस्थापित होवून जनतेची लोकशाही अस्तित्वात यावी, यासाठी संघर्ष केला पाहिजे. राज्यघटनेला विरोध करणारे लोक राज्यघटनेचा आधार घेत लोकांचे लोकशाही अधिकार हिसकावून घेत आहेत. धोकादायक पार्श्वभूमीवर लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण लोकशाही उत्सवाचे आयोजन करीत आहोत.  या उत्सवात आपण सक्रिय सहभागी व्हावे. आपली उपस्थिती आवश्यक आहे. 

आपले स्नेहांकीत

डॉ. प्रशांत शिंदे अध्यक्ष
 प्रा. डॉ. बापू चंदनशिवे 
सचिव
अशोक सब्बन
खजिनदार

*लोकशाही उत्सव समिती*, 
अहमदनगर
close