shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पोलिस रेझिंग डे निमित्ताने जिल्हाभरात सायबर सुरक्षा मोहिम राबविणार - एस.पी. श्रीकांत धिवरे



जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे - जिल्हाभरात पोलिस दलातर्फे व 'पोलिस रेझिंग डे" च्या निमित्ताने सायबर सुरक्षा मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्रसिध्द सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांचा सायबर अॅवरनेस फौंडेशनचा सहभाग असणार आहे. 


या मोहिमे अंतर्गत नागरीकांना सायबर सुरक्षा विषयी वेगवेगळया माध्यमाने जागरुक करण्यात येणार आहे. तसेच धुळे जिल्हयातील नुतन पोलिस अधिक्षक साहेब श्री. एस. पी. श्रीकांत धिवरे व अप्पर पोलिस अधिक्षक श्री. किशोरजी काळे यांच्या संकल्पने अनुसार ही मोहिम जिल्हयातील विविध कॉलेज, शाळेत व ग्रामीण भागात राबविण्यात येणार आहे. जेणेकरुन आजची युवा पिढी ही आजच्या डिजीटल युगात सुरक्षित राहील. यासाठी पोलिस निरिक्षक श्री. धनंजय पाटील आणि सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी नुकतेच कनोसा कॉन्व्हेंट हायस्कूल येथे विदयार्थी वर्गाला सायबर सुरक्षितते बाबत सखोल ज्ञान दिले. यावेळेस श्री. पाटील यांनी विदयार्थ्यांना सांगितले की आपण के.बी.सी. लॉटरी फ्रॉड पासून सावधान राहावे व डिजीटल युगात आपण व आपले परिवार यांनी कशी सुरक्षितता बाळगावी या संदर्भात सांगितले. यावेळेस अॅड. भंडारी यांनी विदयार्थ्यांना सायबर स्टॉकींग व सायबर बुलिंग बाबत सुरक्षिततेचे काही महत्वाच्या टिप्स दिल्या व मुलांनी ऑनलाईन गेमिंग पासून दूर राहावे व मैदानी खेळ खेळावे असे त्यांनी सांगितले व आपल्यासोबत सायबर गुन्हा घडल्यास १९३० वर संपर्क साधावे असे आवाहन केले. यावेळेस कॉन्स्टेबल श्री. दिलीप वसावे व प्रियंका देवरे यांनी देखील विद्यार्थी वर्गाला सायबर गुन्हयांबाबत त्यांचे अनुभव शेअर केले. हे सायबर सुरक्षा व जनजागृती अभियान धुळे जिल्हयातील पोलिस अधिक्षक श्री. एस. पी. श्रीकांत धिवरे व अप्पर पोलिस अधिक्षक श्री. किशोरजी काळे, उपविभागीय अधिकारी श्री. ऋषिकेश रेड्डी, सायबर सेलचे पोलिस निरिक्षक श्री. धनंजय पाटील व सायबर अॅवरनेस फौंडेशनचे अध्यक्ष अॅड. चैतन्य भंडारी यांचा संकल्पने प्रमाणे संपुर्ण धुळे जिल्हयात व ग्रामीण भागात "पोलिस रेझिंग डे" निमित्ताने राबविण्यात येणार आहे.
close