श्रीरामपूर प्रतिनिधी:
मोक्षा चोपडा यांचा भगवती दीक्षा समारोह श्रीरामपूर मध्ये होणे मोठे भाग्याचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले आहे. श्रीरामपूर येथील जैन समाजातील प्रसिद्ध व्यापारी नेमीचंदजी माणकचंदजी चोपडा यांची नात व उद्योजक प्रशांत नेमीचंदजी चोपडा यांची कन्या मोक्षा चोपडा यांचा जैन भगवती दीक्षा समारोह श्रीरामपूर येथील थत्ते मैदान रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता संपन्न होणार आहे.
श्रीरामपूर मधील जैन संघास ४० वर्षानंतर मोक्षा चोपडा यांच्या रूपाने जैन भगवती दीक्षा करण्याचे भाग्य लाभले आहे. श्रीरामपूर ची भूमी प्रभू श्रीराम, राष्ट्रसंत पु.श्री. आनंद ऋषीजी, कर्नाटक गजकेसरी गुरुदेव पु.श्री. गणेश मलजी महाराज साहब व अनेक संत साध्वीजी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. मोक्षा चोपडा यांच्या दीक्षा महोत्सवासाठी श्रीरामपूर नगरीमध्ये प. पू. प्रतिभा कंवर जी म. सा. यांचे आगमन झालेले आहे. याप्रसंगी मोक्षा चोपडा यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष राजश्रीताई ससाणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मा. नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे, मा नगरसेवक रमेश शेठ कोठारी,दिलीप नागरे, अशिष धनवटे,रितेश रोटे, सुहास परदेशी, प्रवीण नवले, मनसुख चोरडिया, रमेश गुंदेचा, नंदू कोठारी, जावेद शेख, सनी मंडलिक, युनुस पटेल, अजय धाकतोडे, गोपाल भोसले, विशाल साळवे, देवेन पिडीयार, आकाश जावळे, श्रेयस रोटे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*पत्रकार राजु मिर्जा
(ब्यूरो चिफ: नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111

