shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दक्ष पोलिस मित्र सामाजिक संस्थेचा कौतुकास्पद उपक्रम ; पत्रकार दिनी पत्रकारांचा केला सन्मान

नगर / प्रतिनिधी

नगर : दि . ६ /  दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त  पत्रकार दिनाचे औचित्य साधुन दक्ष पोलिस मित्र सामाजिक संस्था ,ता. नेवासा, जि. अहमदनगर यांच्या वतीने पत्रकारितेत उत्तम कामगिरी करणारे सर्वोत्कृष्ट विशेष पत्रकार पुरस्कार सन २०२३-२४  शनिवार दि . ६ /१/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता अहमदनगरचे तहसीलदार श्री. संजय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत  कै.दादा पाटील शेळके कृषि उत्पन्न बाजार समिती, शेतकरी भवन, अ.नगर येथे संपन्न झाला .सामाजिक राजकिय सांस्कृतिक कार्यात पत्रकारितेत  उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल  पत्रकार दिना निमित्त पुरस्कार देऊन पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.


याप्रसंगी तहसीलदार श्री . संजय शिंदे, एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री . राजेंद्र सानप, नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री . शिशीरकुमार देशमुख, शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्री . मोरेश्वर पेमदान, कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री . दिनकर मुंडे, कोतवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री . चंद्रशेखर यादव बार असोसिएशनचे उपअध्यक्ष ॲड . श्री . महेश शेडाळे आदी मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या .


यावेळी नानासाहेब चेडे (लोकमत) राष्ट्रप्रथम न्यूज चे सुर्यकांत बन्सी होनप, ग्रामीण पत्रकार संघ उपजिल्हा अध्यक्ष शिवहरी माणिक म्हस्के , जिल्हा सचिव संजय वायकर,  आसावरी वायकर, रफीक शेख( दै. प्रभात)  , दुर्गेश राठोड , अन्सार शेख, 
अशोक तांबे, प्रविण देशमुख,  नितिन  आढाव, जावेद शेख,गिरिष रासकर, विनोद साळवे, प्रशांत शिंदे,हेमंत साठे, सबिल सय्यद ,अनिकेत यादव , अविनाश निमसे नगरी दवंडी चे ज्ञानदेव गोरे , दै. पुढारी खासेराव साबळे लोकमत, दै . सकाळचे राजेंद्र पानकर , महेश भोसले,हेमंत साठे,सौरभ गायकवाड आदि पत्रकार उपस्थित होते .

दक्ष पोलिस मित्र सामाजिकसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष  शहादेव मुंगसे, उपाध्यक्ष शारदा मुंगसे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब  काळपुंड, नाना भोरडे , गौरी भोस ,  ऐश्वर्या पवार, सुनिता भाकरे , रेखा नवसे, मिरा पडळकर , मच्छिंद्र ढाकणे, प्रतीक ठोंबे , तुषार धावडे, अभिषेक चौघुले, अल्तमश शेख यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सबिल सय्यद यांनी केले तर शहादेव मुंगसे यांनी आभार व्यक्त केले .
close