shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बोरी येथील खंडोबाचे राजवर्धन पाटील यांनी घेतले देवदर्शन* - शेतकरी वर्गाच्या सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना.




*बोरी येथील खंडोबाचे राजवर्धन पाटील यांनी घेतले देवदर्शन*
    - शेतकरी वर्गाच्या सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना.
   इंदापूर : दरवर्षी बोरी ता. इंदापूर येथे खंडोबा यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.मोठ्या भक्ती भावाने अनेक व्यक्ती या यात्रेमध्ये सहभागी होत असतात. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख व निरा भिमा आणि कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी या यात्रेत सहभागी होऊन खंडोबा देवाचे दर्शन घेतले तसेच शेतकरी वर्गाला सुख समृद्धी यावी यासाठीची प्रार्थना केली.
     यात्रा कमिटीच्या वतीने राजवर्धन पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
   महेंद्र चव्हाण ,वैभव देवडे, सचिन वाघमोडे तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close