इंदापूर तहसील हिंदी अध्यापक संघ इंदापूर यांच्यावतीने एन. ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर च्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान .
इंदापूर:- इंदापूर तहसील हिंदी अध्यापक संघ इंदापूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शाला अंतर्गत हिंदी निबंध स्पर्धेमध्ये खालील विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले आहेत.
त्यांना इंदापूर तहसील हिंदी अध्यापक संघ यांच्या वतीने प्रमाणपत्र व शाळेला ट्रॉफी देऊन विद्यालयाचा सन्मान करण्यात आला . त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे उपाध्यक्ष ता. का. सूर्यवंशी उपस्थित त्याचवेळी हिंदी भाषा समितीच्या सदस्य डॉ. रंजनाताई पिंगळे व त्यांचे इतर सर्व सहकारी देखील उपस्थित होते.
सदरचा सन्मान विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत रणवरे सर यांनी केतकेश्वर सांस्कृतिक भवन निमगाव केतकी येथे पुणे जिल्हा शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत सर यांच्या उपस्थितीत व पुणे जिल्हा हिंदी अध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे सर व हिंदी अध्यापक संघाचे तज्ञ प्राध्यापक सुधाकर भोंग व त्यांचे इतर सर्व सहकारी यांच्या हस्ते स्वीकारला.
एन. ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर च्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करताना प्राचार्य म्हणाले की, या विद्यार्थ्यांचे यश म्हणजे एन ई .एस .हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा सन्मान आहे. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे यश त्यावेळी त्यांनी हिंदी विषयाचे अध्यापक प्रमोद ज्ञानदेव चव्हाण सर व पर्यवेक्षक मधुकर शंकर खरात सर यांचे देखील अभिनंदन व कौतुक केले.
गटानुसार क्रमांक आलेले विद्यार्थी खालील प्रमाणे विद्यार्थी आहेत
इयत्ता पाचवी सहावी
1. नेहा संतोष रणवरे
2. भावार्थ संतोष कारंडे
3. वेदांत सचिन कारंडे
इयत्ता सातवी आठवी
1. वैष्णवी शिवाजी शेळके
2. वैष्णवी शिवाजी शेंडगे
3. राधिका धुळदेव शिंदे
इयत्ता नववी दहावी
1. स्नेहल भानुदास भुजबळ
2. साजिया बरकत अली डांगे
3. शिवानी संतोष रणवरे
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत रणवरे सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख श्री चंद्रकांत बोंद्रे सर व सर्व शिक्षक बंधुभागिणी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

