shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हरिगांव -उंदिरगांव परिसरामधे आयुष्यमान भारत कार्ड काढण्याचे काम सुरु !


श्रीरामपूर प्रतिनिधी:
 श्रीरामपुर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केन्द्र उंदिरगांव यांच्या माध्यमातुनसुद्धा हरिगांव - उंदिरगांव परिसरामधे ठिकठिकाणी नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड देण्याची सुविधा सुरू केली असुन नागरीकांनी आरोग्य कार्ड काढुन घ्यावे असे आवाहान  प्राथमिक आरोग्य केन्द्र आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल राजगुरू यांनी केले आहे. 

भारत सरकारच्या आयुष्यमान भारत अभियान अंतर्गत लाभार्थ्यांना पाच लाखा पर्यंत दवाखान्याचा खर्च मोफत केला जातो. या कामी प्राथमिक आरोग्य केन्द्राचे कय्युम देशमुख, अजित गायकवाड , अविनाश पंडित , संदिप माने , गिरीश जाधव , राजेन्द्र बिरंगल , रामदास दळवी , आरोग्य सेविका सविता उजागरे , आशा वर्कर मंगल परदेशी , शर्मिला शेख , माया पंडित आदी कार्यरत आहेत.
तरी नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रमार्फत आपले आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्यावे असे आवाहनही डॉ. सुनील राजगुरू यांनी केले आहे.

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close