shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सर्व क्षेत्रात महिलांचे सबलीकरण, सुरक्षा व समानता हीच सावित्रीबाई फुले यांना खरी मानवंदना = डॉ. बाबुराव उपाध्ये


श्रीरामपूर प्रतिनिधी:
माणूस किती जगला, यापेक्षा कशासाठी जगला हेच आयुष्याचे खरे सार्थक असते. ६६ वर्षाचे जीवन लाभलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. आजच्या काळात सर्व क्षेत्रात. महिला सबलीकरण,तिचे सुरक्षित आयुष्य व स्त्रीपुरुष समानता निर्माण होण्यातच त्यांना खरी मानवंदना होय, असे विचार रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कॉन्सिल सदस्य, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले. 

   भूमी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थेतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती दूरदर्शी पद्धतीने आयोजित करण्यात आली होती, याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी ॲड्. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन, माजी प्राचार्य टी. ई. शेळके होते.प्रारंभी प्रतिमापूजन झाले. भूमी फाऊंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष प्रा. कैलास पवार यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा.शिवाजीराव बारगळ, कवयित्री संगीता फासाटे,गुजरातहून निवृत्ती पाटील, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील सचिन जाधव,सावित्रीबाई फुले  पुणे विद्यापिठातून संदीप उमाप, आरोग्यमित्र सुभाषराव गषयकवाड आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.
डॉ. बाबुराव उपाध्ये आपल्या भाषणात पुढे म्हणाले,           एकोणविसाव्या शतकातील सामाजिक, शैक्षणिक स्थिती अतिशय प्रतिकूल होती. ०३ जानेवारी १८३१ रोजी जन्म झालेल्या सावित्रीबाई फुले यांचे निधन १० मार्च १८९७ रोजी निधन झाले.
६६ वर्षाच्या जीवन काळात सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाचे अपूर्व कार्य केले. म.फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्यात त्या मनापासून समर्पित झाल्या.
०१ जानेवारी १८४८ रोजी त्यांनी स्त्रीशिक्षणासाठी पहिली शाळा सुरु केली, म्हणूनच आज स्त्रीशिक्षण, स्त्रीसुधारणा, स्त्रीसमानता,सबलीकरण त्यातून कणखर स्त्री उभी राहिली आहे,सावित्रीबाईंचे हे कार्य अधिक गतिशील राहण्यासाठी त्यांचे कार्य, विचारांचे आदर्श जपले पाहिजेत,'काव्यफुले'या सावित्रीबाई फुले रचित कवितासंग्रहातील काही  कविता डॉ. उपाध्ये सादर केल्या. प्राचार्य टी. ई. शेळके आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले,प्रा. कैलास पवार यांनी भूमी फौंडेशनच्या माध्यमातून एकल महिला,निराधार मुलींसाठी शिक्षण, वसतिगृह आणि अनेक दुर्बल, निराधार महिलांसाठी विविध उपक्रम सुरु केले.आहेत त्यांचे हे कार्य हीच खरी सावित्रीबाई फुले यांना दिलेली मानवंदना आहे,  जयंतीचा सार्थ अर्थ सांगणारी वाटचाल आहे, असे सांगून प्राचार्य शेळके यांनी आजच्या स्त्रीशिक्षणाकडे लक्ष  देणे,तिचे स्वातंत्र्य जपणे, तिला प्रतिष्ठा देणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.प्रा. कैलास पवार यांनी भूमी फौंडेशनच्या प्रेरणा असलेल्या चित्रपट अभिनेत्री यांचे योगदान आणि सावित्रीबाई फुले यांचे चरित्र सांगत आज भूमी फाऊंडेशन निराधार मुलींचे वसतिगृह सुरु करीत आहे, त्यासाठी देणगीदार आणि अधिकारी यांच्याकडून योगदान लाभले तर हे कार्य अधिक गतीने पुढे जाईल अशी भावना व्यक्त केली. सौ.अनिताताई पवार यांनी नियोजन केले.  सूत्रसंचालन करीत प्रा. पवार आभार मानले.

*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close