shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अन्याय अत्याचार निर्मूलन समिती व आरपीआय यांच्या संयुक्त विद्यमाने "स्वागत नवीन वर्षाचे व्यसनमुक्ती ने" स्तूत्य उपक्रम

वजीर शेख -पाथर्डी
पिंपळगांव बसवंत जि.नाशिक:
 तरुण पिढीला व्यसनाच्या आहारी जाण्यापासून वाचवणे काळाची गरज ओळखून तिस वर्षापासून मादकद्रव्य व अंमली पदार्थाच्या होळी उपक्रमांतर्गत पिंपळगाव बसवंत येथे स्वागत नवीन वर्षाचे व्यसनमुक्ती ने हा स्तूत्य उपक्रमाचा कार्यक्रम संपन्न झाला.
अन्याय अत्याचार निर्मुलन समिती व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया यांचे संयुक्त विद्यमाने पिंपळगाव बसवंत येथील जिजाऊ उद्यानात मादकद्रव्य व अमलीपदार्थांच्या प्रतिकृती पुतळ्याची होळी करण्यात आली असून व्यसनमुक्तीची शपथग्रहणाचा कार्यक्रम पिंपळगाव बसवंत चे सरपंच भास्करराव बनकर यांचे अध्यक्षतेखाली तर समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष रविंद्रदादा जाधव, पोलीस निरीक्षक अशोकराव पवार, जिल्हाध्यक्ष संजयबाबा गायकवाड यांचे प्रमुख उपस्थितीत दि.३१ डिसेंबर २०२३ रोजी नववर्षाच्या प्रारंभी संपन्न झाला. 
या वेळी प्रास्ताविक आयोजक रिपाई तालुकाध्यक्ष महेंद्रभाऊ साळवे यांनी करुन दारूमुळे संसाराची व शरीराची होणारी हानी संदर्भात स्वताचा अनुभव कथन केला. तर  विचार पिठावरून रविंद्रदादा जाधव म्हणाले की देशातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी चालली आहे. तरुण पिढी व्यसनाच्या आहारी किंवा चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्यांना वेळीच थांबवणे काळाची गरज आहे. होतकरू तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांचे आयुष्य तर अंधारात ढकलतातच आणि त्याबरोबर एक उज्ज्वल भविष्याचे स्वप्नदेखील विरून जाते म्हणून अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या माध्यमातून ३१ डिसेंबर च्या रात्री नववर्षाच्या प्रारंभी मादकद्रव्य व अंमलीपदार्थाची होळी करुन शपथविधी घेऊन आगळावेगळा उपक्रम राबवून तरुणांनी व्यसनमुक्तीचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन जाधव यांनी केले.




या प्रसंगी संजयबाबा गायकवाड, पो.नि.अशोकराव पवार,यांनीही कार्यक्रमास शुभेच्छा देवुन व्यसनमुक्तीची शपत घेतली. कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंपळगाव बसवंत चे सरपंच भास्करराव बनकर म्हणाले की मादकद्रव्याचे 
 व्यसन हे जवळच्या व्यक्तीकडूनच लागण्याची शक्यता जास्त असते. घरातील व्यक्तीला व्यसन असल्यास त्याचा परिणामही मुलांवर होतो. जेव्हा मुले लहान असतात तेव्हा त्यांना एवढी समज नसते. तुमच्या व्यसनाचा आजूबाजूच्या लोकांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. वाईट सोबतीमुळे आजची पिढी व्यसनाधीन होत असल्याचे दिसून येत आहे.चला तर संकल्प करूयात, आपल्या पुढच्या पिढीला व्यसन मुक्त करूयात असे प्रतिपादन केले.
तथा गत तीस वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात असल्याचे संयोजक म्हणाले.
 या कार्यक्रमाचे सुत्रासंचालन अआनिस चे प्रदेश निमंत्रक प्रदीपनाना गांगुर्डे यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून समितीच्या पदाधिकारी शशीभाऊ जाधव, वैशालीताई जाधव, राजनंदीनी आहीरे, शब्बीर खाटीक, निर्मला गायकवाड, संगिता पवार, शिलाताई जाधव, संगिता गायकवाड, राजेंद्र जाधव, वनिता काळे, वृषाली शेलार, रोहीनी वाघ, अशोक बागुल, गोपीनाथ वाघमारे, मिलिंद जाधव, सोमनाथ गांगुर्डे, राज जाधव, संतोष मेंबर गांगुर्डे, सुरेश गांगुर्डे, सन्नी गांगुर्डे,आदी. मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोकभाऊ गांगुर्डे, भारत गांगुर्डे, बाळासाहेब चोहळे, चंदनभाऊ सुरडकर, लक्ष्मण गागुर्डे, रोहीत वाघ, आकाश सकट, प्रकाश गांगुर्डे, प्रमोद शिरसाट, आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शेवटी दुध प्राशन करून राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

*पत्रकार राजु मिर्जा
ब्यूरो चिफ: नाशिक विभाग
(स्वाभिमानी संपादक सेवा संघ)
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -  9561174111
close