shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सामाजिक कार्यकर्ते शंकर कळंबाटे परिवारातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप अभियान संपन्न


 चिपळूण प्रतिनिधी:
तालुक्यातील तोंडली २ येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.शंकर कळंबाटे आणि परिवार नेहमीच विविध कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असते, आणि सध्या या परिवाराने शैक्षणिक साहित्य वाटप अभियान २०२४ हाती घेतले आहे. 

त्या अनुषंगाने आज २६ जानेवारी २०२४ या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जि.प.पू. प्राथमिक शाळा तोंडली नंबर २ येथील विद्यार्थ्यांना कळंबाटे परिवाराच्यावतीने शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात येवून सदरील अभियान राबविण्यात आले.याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थ, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी यांच्या अगणित आनंद आणि उत्साह पाहून शंकर कळंबाटे परिवाराचा आनंद गगनात मावेनासा असा  झाला होता.
यावेळी उपस्थित शंकर कळंबाटे, कु. जनार्दन कळंबाटे, हरेश्र्वर कळंबाटे, कु.आदित्य कळंबाटे, रामचंद्र कळंबाटे,सचिन राऊत, प्रणित किर्वे,दिनेश कळंबाटे, कु. सतीश नावळे, मंगेश कांबळे ग्रामस्थ मंगेश कांबळे, गणपत कळंबाटे, प्रकाश कांबळे, अनंत कांबळे, दत्ताराम कांबळे, गुणाजी कळंबाटे, आदिती कळंबाटे आणि शिक्षक गुरूवर्य मुख्याध्यापक संतोष लक्ष्मण चाळके, शिक्षिका स्नेहा संजय गुजर, शिक्षक अविनाश विठोबा भंडारी, पदवीधर शिक्षक राजेश यशवंत चव्हाण तसेच शाळेतील विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close