भोकर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यात प्रतिष्ठेच्या असलेल्या भोकर विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी माजी आमदार भानुदास मुरकूटे गटाचे आण्णासाहेब काळे यांची तर जिल्हा बँकेचे संचालक उपनगराध्यक्ष करण ससाणे गटाच्या गं.भा.सिताबाई जगदाळे यांची बिनविरोध निवड झाली.
अशोक कारखाण्याचे अध्यक्ष माजी आमदार भानुदास मुरकूटे व उपाध्यक्ष पुंजाहरी शिंदे तसेच जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांचे मार्गदर्शनाखालील भोकर विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्षपदासाठी माजी आमदार भानुदास मुरकूटे गटाचे आण्णासाहेब कारभारी काळे याचे नावाची सुचना महेश पटारे यांनी मांडली त्यास गणेश छल्लारे यांनी अनुमोदन दिले तर उपाध्यक्षपदासाठी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे गटाच्या गं.भा.सिताबाई रामदास जगदाळे यांचे नावाची सुचना सागर शिंदे यांनी मांडली त्यास निलेश विधाटे यांनी अनुमोदन दिले. दोन ही जागांसाठी एक-एक उमेदवारी अर्ज आल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध झाली. यावेळी याकोब अमोलीक हे एकमेव संचालक आजारी असल्याने अनुपस्थीत होते.
अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी नंतर झालेल्या सन्मान सोहळ्यात मावळते अध्यक्ष गणेश छल्लारे, माजी उपसरपंच महेश पटारे, ज्येष्ठ नेते भागवतराव पटारे व पत्रकार चंद्रकांत झुरंगे यांचे मार्गदर्शनपर भाषणं झाली. त्यात सर्वानुमते ठरलेल्या रोटेशन पद्धतीनुसार मावळते अध्यक्ष गणेश छल्लारे व उपाध्यक्षा सौ. सुमनबाई मते यांनी राजीनामा दिल्याने या निवडी शक्य झाल्या आहे. यापुढे ही उर्वरितांना वेळेत पद दिले जातील तसेच संस्थेत चोख कारभारातून संस्थेची प्रगतीकडे वाटचाल सुरू असल्याचे गणेश छल्लारे व महेश पटारे यांनी सांगीतले तर आजच्या संचालक मंडळाच्या कारभारावर मी समाधानी असून येत्या काळात संस्थेच्या सभासदांना लाभांश मिळणार असल्याचा विश्वास भागवतराव पटारे यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेवून संस्थेच्या व सभासदांच्या हिताचे निर्णय घेवून संस्थेत विकासात्मक कामांना प्राधान्य देत चोख कारभार करणार असल्याचे नवनिर्वाचीत अध्यक्ष आण्णासाहेब काळे यांनी सांगीतले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अध्यासी अधिकारी प्रकाश शिंपी यांनी काम पाहीले, त्यांना संस्थेचे सचीव सिताराम कर्जुले यांनी सहकार्य केले. शेवटी राधाकीसन विधाटे यांनी आभार मानले.
यावेळी बाळासाहेब विधाटे, कारभारी तागड, पंढरीनाथ मते, सागर शिंदे, नानासाहेब जगदाळे, दत्तात्रय पटारे, दिपक शेळके, सतीष शेळके, भाऊराव सुडके, संजय पटारे, गंगाराम गायकवाड, ठकसेन खंडागळे, बाबुराव तागड, नारायण पटारे, राधाकीसन विधाटे, नामदेव चव्हाण, दत्तात्रय काळे, ज्ञानेश्वर काळे, सुरेश अमोलीक, सुनिल विधाटे, पप्पू थोरात, दिपक भोईटे, पोपट काळे, सुकदेव आबुज, बाबासाहेब जगदाळे, रवींद्र मते, नितीन मते, रावसाहेब पवार, अरूण काळे, भास्कर वाकडे, अविनाश मते, उत्तम लोखंडे, अशोक शेळके, सौ. सुमनबाई मते, अरविंद धनेश्वर व गोरक्षनाथ आबुज आदिंसह मोठ्या संख्येने सभासद व ग्रामस्थ उपस्थीत होते.
*पत्रकार चंद्रकांत झुरंगे -भोकर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

