shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बिहार येथील अल्पवयीन मुलीला पळवून आणले आणि सलग तीन महिने बलात्कार..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे 
सोमवार दिनांक १५ जानेवारी २०२४

नागरिकांनी आरोपी तरुणाची यथेच्छ धुलाई करुन पोलिसांच्या ताब्यात दिले..!!

दोन आरोपींना गजाआड करुन बलात्कार, पोस्को व ॲट्रोसीटी अंतर्गत गुन्हा दाखल..!!

राहुरी  : बिहार येथून फूस लावून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीला दमदाटी व धमकी देऊन सलग तीन महिने बलात्कार करण्यात आला. सदर घटना राहुरी तालूक्यातील ब्राम्हणी येथे घडली असून आरोपी तरुणाची नागरिकांनी यथेच्छ धुलाई करत राहुरी पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. 
         या घटनेतील आरोपी आफताबसाह बदसासाह शाई, वय १९ वर्षे हा बिहार राज्यातील भुहालपूर आवडा, सैदसाराय येथील रहिवाशी आहे. त्याचे व येथीलच इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे प्रेम संबंध होते. आरोपी आफताबसाह शाई याने तीन महिन्यापूर्वी त्या अल्पवयीन मुलीला फूस लावून जोर जबरदस्ती करुन तीला पळवून आणले. आफताबसाह शाई याची बहिण राहुरी तालूक्यातील ब्राम्हणी येथे राहत असल्याने त्याने त्या अल्पवयीन मुलीला बहिणीच्या घरात ठेवले. आरोपी आफताबसाह शाई हा पिडीत मुलीला धमकी देऊन तीच्यावर सलग तीन महिन्यांपासून बलात्कार करीत होता. 

तसेच त्याची बहिण फरीदा शाई ही तीला धमकावत होती. या दरम्यान फरीदा शाई हिचा पती रोजाद्दीन शाई हा पिडीत मुलीवर अत्याचार करु लागला. सदर घटनेची माहिती पिडीत मुलीने तीच्या बिहार येथील बहिणीला फोन करुन सांगीतली. तेव्हा तीची बहिण व इतर नातेवाईक काल दिनांक १३ जानेवारी २०२४ सकाळी ब्राम्हणी येथे आले. या घटनेची ब्राम्हणी परिसरात वाच्यता झाली. शेकडो नागरिक जमा झाले. नागरिकांनी आरोपी आफताबसाह याची यथेच्छ धुलाई करत आफताबसाह शाई व त्याची बहिण फरीदा शाई यांना राहुरी पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. या दरम्यान आरोपी रोजाद्दीन शाई हा पसार झाला. 

          श्रीरामपुर येथील उप विभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे व राहुरी येथील पोलिस निरीक्षक संजय सोनवणे यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली. घटनेनंतर आरोपी आफताबसाह शाई व त्याची बहिण फरीदा शाई यांना तात्काळ गजाआड करण्यात आले. आरोपी आफताबसाह शाई याच्यावर बिहार राज्यात गुन्हा दाखल आहे. 

पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी रोजाद्दीन घुईल शाई व फरीदा रोजद्दीन शाई, दोघे रा. मोतिराजपुर सारन, सैदसाराय, राज्य बिहार. या दोघांवर गुन्हा रजि. नं. ३०/२०२४ भादंवि कलम ३७६(२) (एन), ३२३, ५०४, ५०६ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचापासुन संरक्षण २०१२ चे कलम ४, ६, ८, १२ आणि ॲट्रोसीटी कायद्या कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास श्रीरामपुर येथील उप विभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे हे करीत आहे.

         या घटने बाबत बिहार येथील पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क केला असून तेथील पोलीस पथक राहुरीकडे रवाना झाले आहे. आरोपी आफताबसाह शाई याला बिहार पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल. तसेच या घटनेतील फरार आरोपी रोजाद्दीन शाई याच्या शोधासाठी राहुरी येथील पोलीस पथके रवाना झाली आहेत. अशी माहिती राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक संजय सोनवणे यांनी दिली. 

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close