करमाळा भाजपा ने मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
प्रतिनिधी : संजय वायकर
करमाळा : ९ / करमाळा येथील सुभाष चौक याचे नामांतर करून त्याचे नामकरण ‘ श्रीराम चौक ‘ असे करण्यात यावे यासाठी करमाळा भारतीय जनता पार्टी ने दि . ८ जानेवारी रोजी करमाळा नगर परिषद चे मुख्याधिकारी साहेबांना निवेदन दिले आहे .
करमाळा भाजपाचे शहराध्यक्ष श्री .जगदीश आगरवाल यांनी सांगितले की , दि . २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभु श्रीराम जन्मभुमी तिर्थक्षेत्र आयोध्या येथे होत असलेल्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमीत्त करमाळा येथील सुभाष चौक येथे करमाळ्यातील हजारो रामभक्त, कारसेवक त्यांच्या भावना व अस्मितेचा प्रश्न म्हणून करमाळा येथील सध्याचे चालु नाव सुभाष चौक या ठिकाणी हिंदु धर्म प्रेमी हे खुप मोठ्या स्वरूपाचा यज्ञ करून त्या ठिकाणी रामलल्लाचे प्राणप्रतिष्ठापनाचे प्रत्यक्ष दर्शी होणेकामी व स्वागतकामी हजारोंच्या – संख्येने उपस्थित राहणार आहेत. सदर चौकास सुभाष चौक असे नाव असून सदर चौकाचा इतिहास पाहिला असता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सुभाष चौक नामकरण झालेबाबतचा अथवा तसे कारण असण्याचा कुठलाही कागदोपत्री अथवा प्रचलित पुरावा उपलब्ध नाही. अशा परिस्थितीमध्ये रामलल्लाचे प्रतिष्ठापनेचे शुभ मुहूर्तावर सुभाष चौकाचे नामांतर होवून ‘श्रीराम चौक ‘ असे नामकरण व्हावे . अशी विनंती अग्रवाल यांनी निवेदनात केलेली आहे .
सदर निवेदनावर जितेश कटारिया, पंकज परदेशी ,प्रियाल आगरवाल , महेश चिवटे , स्नेहल कटारिया ,प्रमोद बाबासाहेब फंड , डॉ. श्रीराम परदेशी ,कपिल मंडलिक , डॉ. तानाजी जाधव आदिंच्या सहया आहेत .

