दापोडी:-
गाडकवाडी येथे दापोडी येथील श्रीमती सी.के. गोयल कला वाणिज्य महाविद्यालयाचे "विशेष संस्कार शिबिर"दिनांक १४ जानेवारीपासून संपन्न होत असून शिबिरामध्ये ग्रामस्वच्छतेचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आले. गावातील रस्ते ,शाळा, मंदिरे, चावडी, या ठिकाणी श्रमदान अंतर्गत ग्रामस्वच्छतेचे काम करून गाडकवाडी गाव "चकाचक" करण्यात आले. ग्रामस्थांना ग्रामस्वच्छतेचा संदेश देऊन हा संदेश ग्रामस्थांनी कायमस्वरूपी पाळावा/आपले गाव स्वच्छ ठेवावे.
यासाठी स्वच्छता फेरी/दिंडीच्या आयोजन शनिवार दि.२० जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९:३० ते १०:३० या वेळेत शिबिरार्थींनी केले.
ग्रामस्वच्छतेचा संदेश देणारे महान संत "श्रेष्ठ गाडगेबाबा" यांची प्रतिकृती करून स्वच्छता दिंडी पुढे स्वच्छता करत गाडगेबाबा दिंडीमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे गाडगेबाबांची प्रतिकृती ही दिंडीचे मोठे आकर्षण ठरले.
स्वच्छतादिंडी/प्रभात फेरी संपूर्ण गावात ढोल, ताशा, लेझीम, झांज, यासारख्या वाद्य पथकासह संपूर्ण गावातून घोषणा देत फिरवण्यात आली.
ग्रामस्वच्छता दिंडी/ प्रभात फेरीला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रसिद्ध दिला. ठिकठिकाणी महिलांनी दिंडी थांबून गाडगेबाबांचे पूजन करून अवक्षण केले.
दिंडीमध्ये ग्रामस्थांना स्वच्छतेचा व इतर गोष्टींचा संदेश देण्यासाठी सहभागी शिबिरार्थी विद्यार्थी घोषणा देत जनजागृती करत होते.
"स्वच्छ ठेवा स्वच्छ ठेवा परिसर आपला स्वच्छ ठेवा!"
"गाडगे बाबांचा एकच तंत्र परिसर स्वच्छ हाच मंत्र!"
"झाडे लावा झाडे जगवा!"
"पाणी आडवा पाणी जिरवा!
"वापर करा वापर करा शौचालयाचा वापर करा!"
"मुलगा मुलगी एक समान दोघांनाही शिकवा छान!"
"स्वच्छ ठेवा स्वच्छ ठेवा गाव आपला स्वच्छ ठेवा!"
"स्वच्छता अशेल दारी आरोग्य तेथे वास करी करी!"
अशा घोषणांनी संपूर्ण गावातील परिसर दुमदुमून गेला होता.
स्वच्छता दिंडी/ प्रभात फेरी ही शिबिरामधील सर्वात मोठे आकर्षण ठरले असून सर्वत्र या दिंडीचे कौतुक होत असून दिंडीच्या समारोप प्रसंगी ग्रामस्थांनी यापुढे गाव स्वच्छ ठेवण्याचा व गावातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरासमोरचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आश्वासन दिले. शिबिरार्थींचे ग्रामस्थांनी धन्यवाद व्यक्त करून आभारी व्यक्त केले.
प्रभात फेरीचे संयोजन: राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.सिद्धार्थ कांबळे, उत्तम गोरड ,अक्षदा पानसरे, लक्ष्मण, कोहिनकर यांनी केले.
त्यांना विद्यार्थी प्रतिनिधी श्री. काजल काटे, कपिल कांबळे, मंदार गावडे, शितल भोसले, धीरज ससाणे, रत्नप्रभा मोरे, जयराज मोरे यांनी सहकार्य केले

