युवा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने महा वस्त्रदान कार्यक्रम.
इंदापूर :
जे का रंजले गांजले..
त्यासी म्हणे जो आपुले
तोची साधू ओळखावा..
देव तेथेची जाणावा!!
दि. १४ जानवारी २९२४..
नरुटवाडी जवळील ऊस तोडणी कामगारांच्या पालावर जाऊन चाळीसगाव छतीसगड अशा आदिवासी भागातील १०० ऊस तोडणी मजूर कुटुंबानं कपडे २०० हून अधिक लहान बाळाना खाऊ ,बिस्कीट, फरसान, जिलेबी तसेच कपड्यांच्या स्वरूपात युवा क्रांती प्रतिष्ठान च्या सहकारी मित्र परिवाराने मदत केली.
समाजातील विविध स्तरातून दर वर्षी युवा क्रांती प्रतिष्ठान च्या आवाहनाला प्रतिसाद देत वापरातील कपडे खेळणी चपला शैक्षणिक साहित्य याची मदत होते.
अतिशय दुर्गम भागातून हे आदिवासी लोक आपल्या या ऊस क्षेत्रात अक्षरशः वाऱ्या वरचा संसार जगतात..गाव कुसा बाहेर ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता पाला वर आपल्या लेकरा बाळ सोबत ही कोयती पाला वरच जीवन जगतात.
मजुराच्या लेकरानी मजुरीच बाळकडू आणि कष्टाची शिदोरी आपल्या बाप जाद्या कडून घ्यावी आणि या कारखानदारांची कारखानदारी सुरळीत पार पडावी म्हणून यांच्या साठी ना आर्योग्याची तरतूद ना यांच्या या रान पाखरा साठी साखर शाळेची सोय..
*राईट टू एज्युकेशन* ॲक्ट आहे पण फक्त कागदा वर किंवा जिल्हा परिषदेच्या बंद पडत चाललेल्या मोडक्या तोडक्या शाळेच्या चार भिंती आड .. वाड्या वस्त्या वरील शाळेचा पट भरत नाही म्हणून शाळा बंद करायला निघालेले सरकार आणि त्याच शाळे पासून २००/५०० फुटा वर शेकडो लेकरं शिक्षणा पासून वंचित आपल्या आई बापाचं खोपट पाल सांभाळत जगत असतात..
जाऊ द्या ...भरकटायला होत या लेकरांना बघितलं की इंडिया च्या शाहिनींग खाली झाकळेला हा खरा भारत आपण कधी पाहणार आहोत का?
तर मधुराताई पाटील ,पोलिस को. लडकत ,ज्ञानदेव डोंगरे, सचिन परबते, अस्लम शेख, आप्पासाहेब पाटील, श्रीधर चौधरी, प्रशांत शिताप आणि सहकारी मित्र या कार्यक्रमास उपस्थित होते.
विजयमामा शिद ,नंदकुमार गुजर ,मधुरा पाटील, उज्वलाताई गायकवाड, टिल्लू शेख ,सय्यद यांनी मुलांच्या खाऊ बिस्किटे, जिलेबी, फरसाण या साठी सहकार्य केले.
या द्वारे आपणास आवाहन अनायासे ही डोंगर दरयातील जंगलातील रान पाखरे आपल्या गावा जवळ आली आहेत..पोटाची खळगी भरण्यासाठी दुर्गम भागात जाऊन याना मदत करणं खर्चिक आणि अवघड आहे.. आपल्या कड अतिथी देवो भव म्हणाल जात्त..
या लोकांना जाताना आपल्या गावाची माणसाची चांगली आठवण सोबत घेवून जाऊ द्या..
प्रत्येकाने आप आपल्या क्षेत्रातील आलेल्या या ऊस तोडणी कष्टकरी आदिवासी बांधवांना आपल्या प्रेमाचा आपुलकीचा गोडवा या संक्रांतीला देवू या.. चला माणूस बनू या!! जय हिंद..! असे युवा क्रांती प्रतिष्ठानचे
आवाहन प्रशांत उषा भानुदास शिताप यांनी केले.

