shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हरिगांव आज रविवार २१ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर


श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील हरिगांव येथे आज रविवार दि. २१ जानेवारी २०२४ रोजी ग्रामपंचायत हरिगांव व युनिटी आय हॉस्पिटल श्रीरामपूर यांच्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत हरिगांव बाजार तळ, ग्रामपंचायत हरेगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य सुनील शिणगारे यांनी दिली.

या शिबिरात मोतीबिंदू.डोळ्यातून पाणी येणे, चक्कर येणे,डोळ्यात पडदे येणे, धुरकट दिसणे, डोळ्यात लाली असणे, लासूर, डोळ्यात टिक असणे,काच बिंदू, डोळ्यामधील तिरळेपणाची तपासणी आदी विकारावर मोफत तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी नेत्ररोग तज्ञ डॉ. निलम अग्रवाल [एमएस ]ह्या तपासणी करणार आहेत.फेको मशिनव्दारे शस्त्रक्रिया उपलब्ध आहे.याचा हरिगांव ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन नामदेव जगताप, सुनील शिणगारे,सरपंच दिलीप त्रिभुवन आदींनी केले आहे.


*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* - स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close