कौठळी शाळेत जंतनाशक गोळ्यांचे वाटप.
इंदापूर: आज जंतनाशक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठळी येथे जंतनाशक गोळ्यांचे(ALBENDAZOLE) इयत्ता १ ते ४ थी च्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.प्राथमिक आरोग्य केंद्र शेळगाव च्या आरोग्य सहाय्यीका शालन नवले यांनी सर्व विद्यार्थ्यांना गोळी खाण्याचे फायदे,आरोग्य विषयक माहिती सांगितली.आज जे विद्यार्थी गैरहजर असतील त्यांना २० तारखेला मॉपअप दिनी गोळी देण्यास सांगितले.यावेळी आरोग्य सहाय्यक गिरीश जगताप,आरोग्य सेवक सोमनाथ कांबळे, आरोग्यसेविका सुरेखा फरांदे,आशा सेविका मनीषा चितारे,आशा सेविका सुषमा नरळे,शिक्षिका आरती गायकवाड,मुख्याध्यापक भारत ननवरे उपस्थित होते.

