*लिनेस क्लब ऑफ इंदापूरच्या अध्यक्षा उज्वला गायकवाड बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड ने सन्मानित*
इंदापूर : ता. २५ जानेवारी रोजी शेगाव येथे झालेल्या
*ऑल इंडिया लिनेस क्लब मल्टिपल चतुर्भुज.*
महिला परिषदे मध्ये लिनेस क्लब ऑफ इंदापूरच्या अध्यक्षा. उज्वला प्रकाश गायकवाड यांना चार पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यामध्ये बेस्ट प्रेसिडेंट पुरस्कार. डिस्ट्रीक्ट सचिव सोशल अँक्टिव्हिटी पुरस्कार. लिनेस क्लब ऑफ इंदापूर बेस्ट अँक्टिव्हिटी पुरस्कार. आणि ऑल इंडिया लिनेस क्लब कडून एक्टीव लिनेस पुरस्कार देऊन सम्मानीत करण्यात आले.
यावेळी त्या म्हणाल्या.हे सर्व शक्य झाले. माझ्या सर्व लिनेस सहकारी मैत्रिणींन मुळे व लिनेस क्लब च्या कँबिनेट ऑफिसर डॉ, कल्पना खाडे मँडम यांनी लिनेस क्लब ऑफ इंदापूर साठी दर्जेदार अँक्टिव्हिटी दिल्या मुळे मग ते वंध्यत्व निवारण शिबीर असो किंवा कँन्सर तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी,गरजू महिला भगिनींना फी न घेता तपासणी असे अनेक उपक्रम घेतले. उज्वला गायकवाड यांनी एका गरीब विद्यार्थ्यांस शालेय शिक्षणासाठी लिनेस क्लब साठी दत्तक घेतले आहे. मैत्रिणींच्या सहकार्या मुळे अध्यक्ष व डिस्ट्रीक्ट सचिव. या दोन्ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडता आल्या. असे त्या म्हणाल्या.मैत्रिणींच्या आग्रहस्थव लिनेस क्लब ऑफ इंदापूर अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड झाली. येथून पुढे ही लिनेस श्रेत्रात आवड असल्यामुळे चांगले काम करत राहणार आहे.या वेळी डिस्ट्रीक्ट प्रेसिडेंट प्रा.जयश्री गटकुळ यांना लिनेस क्लब च्या उल्लेखनीय कार्याबद्दल डायनँमीक प्रेसिडेंट या पुरस्काराने सम्मानीत करण्यात आले. या वेळी लिनेस क्लब ऑफ इंदापूर च्या सचिव सुनंदा अरगडे. जयश्री खबाले. रतन पाडुळे. याना हि सम्मानीत करण्यात आले.

