shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वर्गीय आण्णासाहेब जावळे पाटील यांच्या स्वप्नपूर्तीसाठी जीवाचे रान करणार जिल्हाध्यक्ष नितीन पटारे पाटील


श्रीरामपूर प्रतिनिधी :
अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांनी समाज हितासाठी जे जे स्वप्न पाहिले ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून जीवाचे रान करणार असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय छावा संघटनेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष नितीन पटारे पाटील यांनी केले.

          श्रीरामपूर शहरातील बेलापूर रोड जिरेटोप येथे आण्णासाहेब जावळे पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. मराठ्यांचे क्रांतीसूर्य आण्णासाहेब जावळे पाटील यांच्या ११व्या पुण्यतिथी निमित्त श्रीरामपूर शहरातील बेलापूर रोड जिरेटोप येथे अखिल भारतीय मराठा छावा युवा संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
        अखिल भारतीय मराठा छावा युवा संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲड सुभाष जंगले, ॲड  चुडीवाल यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष नितीन पटारे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास श्रीरामपूर पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब तोरणे, संदीप कर्डिले, संजय पोटे, प्रवीण देवकर, दिलीप भागडे, दादासाहेब शेजुळ, शरद बोंबले, अनिल लबडे, निलेश बनकर, राजेंद्र भिंगारे, विजय बडाख, दादासाहेब बडाख आदी यावेळी उपस्थित होते.
       आण्णासाहेब जावळे पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाज हितासाठी समर्पित केले असून समाज कायमच त्यांच्या ऋणात राहील तसेच आण्णासाहेबांचे बलिदान कधीच व्यर्थ जाणार नाही असे यावेळी ॲड सुभाष जंगले म्हणाले.

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
*9561174111
close