shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, कवयित्री सुजाता पुरी यांची ज्योत ही कविता सर्वांना मंत्रमुग्ध करणारी ठरली..!


श्रीरामपूर प्रतिनिधी:
साने गुरुजी साहित्य नगरी अमळनेर (जि.जळगांव) येथे दि.२,३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.या सम्मेलनात, 

"निरांजनाची ज्योत सांगते बाईच्या जन्माची कथा !
शब्दापलीकडे असतात, तिच्या मनातल्या व्यथा!!

कवयित्री सुजाता नवनाथ पुरी अहमदनगर, यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सादर केलेली *ज्योत* ही कविता सर्वांना मंत्रमुग्ध करणारी ठरली. ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साने गुरुजी साहित्य नगरी अमळनेर  जिल्हा जळगांव येथे,२-३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी साहित्यिक, कवी आणि श्रोत्यांच्या मांदियाळीत उत्साहात पार पडले. कवी कट्ट्यावर राज्यभरातील अनेक कवींच्या व कवयित्रींच्या बहारदार कविता सादर झाल्या त्यात निवड झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव कवयत्री श्रीमती सुजाता नवनाथ पुरी यांचाही समावेश होता. व्यासपीठावर विराजमान कवी कट्ट्याचे संयोजक श्री राजन लाखे सर, अखिल भारतीय मराठी साहित्य संघाचे सदस्य गजानन नारे, रमेश पवार, प्राध्यापक प्रसाद देशपांडे, डॉक्टर कुणाल जोशी तसेच स्वागत व आयोजन कमिटीचे सदस्य उपस्थित होते. विशेष म्हणजे इतर दालनात फारसा प्रतिसाद नसतानाही  कवी कट्ट्याचे सभागृह मात्र गर्दीने खचाखच भरलेले होते. अनेक ज्येष्ठ  साहित्यिकांनी कवी कट्ट्याला भेट दिली. सुमारे दीड हजार कवितांमधून २२० उत्कृष्ट कवितांची निवड यासाठी केली गेलेली होती. प्रत्येक साहित्य संमेलनात तीन दिवस असणारा कवी कट्टा या साहित्य संमेलनात दोनच दिवस होता त्यामुळे निवड न झालेल्या अनेक कवी आणि कवयित्रींचा हिरमोड झाला. कवी संमेलन,पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, कथाकथन अशा विविध कार्यक्रमांनी साहित्य संमेलन सजले होते.

*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close