shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

३५ वर्षानंतर वसतिगृहातील माजी विद्यार्थ्यांचे बारामती क्लब येथे स्नेहसंमेलन संपन्न.

३५ वर्षानंतर वसतिगृहातील माजी विद्यार्थ्यांचे बारामती क्लब येथे स्नेहसंमेलन संपन्न.
इंदापूर: डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बारामती येथे वास्तव्य करून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात करियर करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे ३५ वर्षानंतर स्नेहसंमेलन बारामती येथील बारामती क्लब मध्ये रविवार ४ फेब्रुवारी २०२४ रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमाला ५२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजणाने व मान्यवरा च्या हस्ते दिप प्रज्वलन करून झाली. 
या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मोफत उपलब्ध आहेत. यामध्ये मोफत कॉट, गादी, पुस्तके, वह्या, शालेय साहित्य, उत्कृष्ट जेवण, वैद्यकीय सेवा यांचा समावेश आहे. या वसतिगृहात राहून बारामती हायस्कूल व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये उत्कृष्ट व दर्जेदार शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, व्यावसायिक, मेडिकल, पोलीस, प्रशासन, कृषी, इंजीनियरिंग, खाजगी कंपन्या यामध्ये मानाच्या पदावर काम केले आहे व आपल्या मुलांना चांगले घडविले कार्यक्रमाला तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा. डॉ. एन एम नारे हे उपस्थित होते. सरकारच्या मार्फत विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या मार्फत चांगले शिक्षण घेण्याची संधी मिळत आहे. त्याचा फायदा सर्वांनी घेतला पाहिजे व चांगले करिअर घडविले पाहिजे, वसतिगृहातून विद्यार्थ्यांना मानवतेचे चांगले मौलिक विचार मिळतात असा मौल्यवान विचार नारे सरांनी व्यक्त केला. वसतिगृहामध्ये राहून चांगले शिक्षण घेऊन मोठ्या पदावरून निवृत्त झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वसतीगृहामध्ये मोठ्या बहिणीची भूमिका घेऊन विद्यार्थ्यांना चांगले जेवण दिले त्यामध्ये श्रीमती प्रभावती गायकवाड व प्रतिभा गायकवाड तसेच सहकारी विजू ताई गायकवाड यांचा माजी विद्यार्थ्यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. त्यावेळचे वसतीगृह प्रमुख मनसा साहेब, भुजबळसाहेब, सकटसाहेब , सोनवणेसाहेब यांनी चांगली भूमिका पार पाडली व त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे भविष्य घडले. महाराष्ट्र शासनाचे आभार मानण्यात आले. निर्मला कांबळे, सलवदे मॅडम यांनीही भोजन कक्षामध्ये चांगले काम केले. प्रत्येक विद्यार्थी वसतिगृहातील आठवणींनी भारावून गेला होता व मनोगतामध्ये त्यांनी आपल्या भावना प्रकट केल्या. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पत्नीचाही समावेश होता. मा. प्राचार्य साहेबराव ओहोळ, मा. प्राचार्य गौतम पिसे, प्राचार्य बाळासाहेब गायकवाड, माजी उपप्राचार्य डॉ. अरुण कांबळे, प्रा राजेंद्र कांबळे, रजनीकांत गोसावी, वाल्मिक आवटे, प्रा गुणवंत ओगले, राजेंद्र ओगले, अशोक तलवार, राजेंद्र पोळ, डॉ विजय चव्हाण, प्रा प्रकाश सोनवणे, माजी उपसंचालक पुणे हनुमंत कांबळे, जलसंपदा विभागाचे इंजिनियर चंद्रकांत सकट, धनंजय साबळे सर, पुरंदर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी महादेव कांबळे, बांद्रा मुंबईचे पोलीस निरीक्षक नामदेव शेगर, निदेशक तुकाराम डोईफोडे, मुंबई मंत्रालयातील लेखाधिकारी भानुदास नलवडे, भरत सातपुते, पाटबंधारे इंजिनियर नारायण गदादे, भास्कर चौधरी, सायंटिस्ट सुनील पवार, राजू तोरणे, सुनील केंगार, शिवाजी केंगार, भारत ओगले मेडिकल व्यावसायिक, विलास पवार निवृत्त व्यवस्थापक, प्रा माणिक मोरे, घोरपडे सर, नामदास सर, रामभाऊ मदने यांनी मनोगत व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा राजेंद्र कांबळे, प्रा डॉ अरुण कांबळे, श्री रजनीकांत गोसावी, प्रा बाळासाहेब गायकवाड, डी पी मदने यांनी विशेष परिश्रम घेतले बारामती क्लबने उत्कृष्ट नाष्टा, भोजन व हॉलची व्यवस्था केली. राम मंदिरा शेजारील हॉस्टेलसाठी बिल्डिंग उपलब्ध करून देणारे मालक दिलीप दोशी, सध्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह बारामतीचे अधीक्षक भालके सर यांचे आभार प्रा अरुण कांबळे यांनी मानले.
close