shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रणसिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी प्रा.ज्ञानेश्वर गुळीग यांची निवड.

रणसिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी प्रा.ज्ञानेश्वर गुळीग यांची निवड.
फोटो ओळ - कळंब ता. इंदापूर येथे उपप्राचार्य पदी निवडीचे प्रा ज्ञानेश्वर गुळीग यांना पत्र देताना सचिव विरसिंह रणसिंग व प्राचार्य अंकुश आहेर
इंदापूर:- इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता इंदापूर येथील महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी ज्ञानेश्वर चंद्रकांत गुळीग यांची निवड करण्यात आली. इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग व प्राचार्य डॉक्टर अंकुश आहेर यांच्या हस्ते उपप्राचार्य पदी निवडीचे पत्र गुळीग यांना
देण्यात आले.
विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात प्राध्यापक ज्ञानेश्वर गुळीग २८ वर्ष ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत.इतिहास विभागप्रमुख व सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून सध्या कामकाज पहात आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सांस्कृतिक समन्वयक ,राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात प्रबोधन, योग प्रशिक्षक, व्याख्याते,कीर्तनकार , सोलापूर जिल्हा स्तरीय प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षक  व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. अखिल भारतीय होलार समाज संघटना यांच्या माध्यमातून गुणवंत व यशस्वी विद्यार्थी यांचा सन्मान सोहळा तसेच सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग असणारे प्राध्यापक म्हणून परिचित आहेत.त्यांच्या उपप्राचार्य पदी निवडीबद्दल संस्था अध्यक्षा आनंदी रणसिंग ,उपाध्यक्ष प्रकाश कदम ,संस्था विश्वस्त व महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.रामचंद्र पाखरे,डॉ.विजय केसकर, डॉ. विलास बुवा,डॉ.सुहास भैरट,डॉ.प्रशांत शिंदे,प्रा.ज्योत्स्ना गायकवाड ,प्रा.राजेंद्रकुमार डांगे,प्रा.विनायक शिंदे,प्रा.डॉ.तेजश्री हुंबे, डॉ. दादाराव मनेरे,डॉ.वैशाली झगडे ,डॉ.उत्तम वाघमोडे,
डॉ.बबन साळवे ,प्रा.अनिरुद्ध शिंगाडे ,प्रा.सचिन आरडे ,प्रा. मयुरी पाटील, प्रा.योगेश खरात,प्रा.सोनाली चव्हाण,प्रा. कपिल कांबळे, प्रा.विद्या गुळीग,प्रा माधुरी खुळे ,
प्रा.गणेश ठोंबरे,प्रा.नम्रता सपकळ,प्रा.महादेव माळवे, प्रा. सुमेधा रणसिंग, प्रा.राजलक्ष्मी रणसिंग,प्रा.सुजाता पाटील,प्रा.काजल रणवरे ,प्रा.पायल रकटे ,प्रा. सुरेश वाघमोडे,प्रा.आकाश झगडे ,प्रा.महादेव माळवे ,प्रा. दिपाली शिंदे, प्रा.प्राजक्ता सोनवणे,प्रा.तेजस्विनी बोबडे इ. प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर  कर्मचारी  यांनी अभिनंदन केले.


close