shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आपले केस विस्कटलेले असले तरी चालतील पण विचार विस्कटलेले असू देऊ नका - चंद्रकांत फडणीस.

आपले केस विस्कटलेले असले तरी चालतील पण विचार विस्कटलेले असू देऊ नका - चंद्रकांत फडणीस.

इंदापूर:- दहावी व बारावीच्या परीक्षा दोन महिन्याच्या कालावधीत असून आपले केस विस्कटलेले असले तरी चालतील पण विचार विस्कटलेले असू देऊ नका असा  एन . ई .एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याचा तर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्याचा समारंभ दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी आयोजित करण्यात आला . सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध व्याख्याते  चंद्रशेखर सुधाकर फडणीस हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव धनंजय रणवरे हे होते. यावेळी
चंद्रकांत फडणीस यांनी मोलाचा संदेश मार्गदर्शन करताना दिला.

यावेळी सौ नीलांबरी फडणीस, संस्थेचे उपाध्यक्ष संजय रणवरे, प्राचार्य चंद्रकांत रणवरे, सचिन रणवरे,वालचंदनगर पोलीस स्टेशनचे रवींद्र पाटणास तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे चंद्रकांत काळे, मधुकर खरात, हर्षवर्धन रणवरे,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
तसेच पुढे त्यांनी निमसाखर या शब्दावरून विद्यार्थ्यांना निर्भयता, मनन, सामंजस्य ,सावधपणा, खरेपणा, रक्षण या गोष्टींचा वापर करून येणाऱ्या परीक्षेला कसे सामोरे जायचे याचे उत्तम मार्गदर्शन  केले.

याप्रसंगी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी  तसेच शिक्षिका अशा पर्वते ,चंद्रकांत बोंद्रे ,प्राचार्य चंद्रकांत रणवरे, शिवदत्त रणवरे, धनंजय रणवरे यांनी आपली मनोगत व्यक्त केली.

निरोप समारंभ हा जेवढा चांगला असतो तेवढा मनाला भयंकर वेदना देऊन जाणार असतो. कारण आपण पाचवी ते दहावी बारावीपर्यंत आपण घरच्यांपेक्षा जास्त मित्र आणि मैत्रिणींच्या सहवासात असतो. कारण आपल्याला माहिती आहे जे सुखदुःख आपण घरी बोलू व समाजात बोलू शकत नाही ते फक्त आपल्या मित्रांना आणि आपल्या जवळच्या मैत्रिणीला बोलू शकतो .अशा मित्रांना आपण आज निरोप देण्याचा कार्यक्रम घेतला आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे आई-वडील शिक्षक यानंतर जर कोणी आपल्या पाठीशी उभा राहत असेल तर तो मित्र आणि मैत्रिणी उभा राहतात. अशा शब्दात संस्थेचे सचिव धनंजय रणवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा रणवरे ,संदीप रणवरे यांनी केले तर आभार  शेंडे मॅडम यांनी मानले. यानंतर सर्व विद्यार्थी शिक्षक व प्रमुख पाहुणे यांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.
close