shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विज्ञानाने मानवी जीवनात विकासात्मक क्रांती झाली-अय्युब पठाण लोहगांवकर..


पैठण प्रतिनिधी:
आज दि.२८ फेब्रुवारी रोजी नुकताच तालुक्यातील शाहू विद्यालय जायकवाडी (उत्तर) येथे " राष्ट्रीय विज्ञान दिन " मोठ्या उत्सावात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारीत भाषणे, डान्स, विविध ग्रह-तारे, वनस्पती जीवनसत्व या विषयावर साभिनय करून माहीती सांगितली. 

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक शंकरराव वाघमोडे होते. ज्येष्ठ शिक्षक तथा प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक अय्युब पठाण लोहगावकर यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, " विज्ञान हा मानवाचा तिसरा डोळा असून विज्ञानाने मानवी जीवनात विकासात्मक क्रांती घडविली आहे. फक्त मानवाने आपल्या हितासाठीच विज्ञानाचा उपयोग करावा. म्हणजे मानवाला सुख हे प्राप्त होऊन मानव समाधानी जीवन जगेल असेही ते म्हणाले.
यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक- शिक्षिका- शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

*पत्रकार हारुन के. शेख - पैठण
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close