shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कळाशी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ रुपालीताई गोलांडे यांचा छत्रपती शाहू आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित.

कळाशी गावच्या  लोकनियुक्त सरपंच सौ रुपालीताई गोलांडे यांचा छत्रपती शाहू आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित.
इंदापूर: - मौजे कळाशी ग्रामपंचायती च्या १९५६ ते आजपर्यंत च्या म्हणजे ६८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कळाशी गावच्या  आदर्श सरपंच सौ रुपालीताई गोलांडे यांच्या माध्यमातून तो पुरस्कार प्राप्त झाला आहे.

पत्रकार संघाचा यावर्षी चा छत्रपती शाहू आदर्श सरपंच पुरस्कार  आदर्श सरपंच सौ रुपालीताई राजेंद्र गोलांडे यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते छत्रपती शाहू आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. ६८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एक वर्षाच्या आत महिला सक्षमीकरण, आरोग्य स्वच्छता, व बालकांसाठी स्वताच्या मानधनातून भावी पिढी सुदृढ व निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार सुरू केला असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून, इतर ग्रामपंचायतीच्या समोर एक आदर्श निर्माण केला. या प्रेरणादायी किमाची दखल घेत दक्ष मराठी पत्रकार संघाच्या वतीने छत्रपती शाहू आदर्श सरपंच पुरस्कार दिला आहे. पुरस्कार मिळाल्यामुळे इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच गावातील व मान्यवर नागरिकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन होत आहे.
close