इयत्ता १०वी व १२ वी पास नापास विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी व बेरोजगारांसाठी एस के एफ व टाटा स्ट्राईव्ह कंपनी अंतर्गत ट्रेनिंग मोफत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्रीराज दत्तात्रय भरणे यांच्या संकल्पनेतून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये करिअरवर नोकरीची सुवर्णसंधी मोफत.
इंदापूर:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्रीराज दत्तात्रय भरणे यांच्या संकल्पनेतून इयत्ता १०वी व १२ वी पास नापास विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी व बेरोजगारांसाठी एस के एफ व टाटा स्ट्राईव्ह कंपनी अंतर्गत ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये करिअर व नोकरीची सुवर्णसंधी मोफत असून सदर ट्रेनिंग मोफत असणार आहे. तसेच ट्रेनिंग तीन महिन्याच्या कालावधीसाठी पुणे येथे असणार असून ट्रेनिंग मध्ये सकाळी नाष्टा, दुपारी जेवण व रात्री जेवणाची राहण्याची सोय मोफत असणार आहे. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर एस के एफ व टाटा स्ट्राईव्ह कंपनी अंतर्गत सर्टिफिकेशन दिले जाणार आहे. विद्यार्थी विद्यार्थिनी या संधीचा लाभ घेऊन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे व्यवसाय सुरू करू शकतात किंवा कंपनी अंतर्गत जॉब करू शकतात .गुगल फॉर्म भरून रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करावयाचे आहे.तसेच रोजगारभिमुख मोफत प्रशिक्षण, प्रशिक्षणार्थी दारिद्र्यरेषेखाली असावा किंवा कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावी. प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये: चार चाकी आणि दुचाकी वाहन दुरुस्तीचे प्रशिक्षण. प्रशिक्षणामध्ये अद्यावत तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिताचा अधिक समावेश, व्यक्तिमत्त्व विकास, कॉम्प्युटर प्रशिक्षण, उद्योजकता विकासावर भर ,प्रशिक्षणानंतर शंभर टक्के नोकरीसाठी सहकार्य, उद्योजक बनण्यासाठी इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांना उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण व पतपुरवठा .सदर फॉर्म सबमिट करून आपले नाव खालील दिलेल्या नंबर वर संपर्क साधून नोंदवावे अशा स्वरूपाची माहिती राहुल गुंडेकर यांनी दिली.
सदर FORM SUBMIT करुन आपले नाव खालील दिलेल्या नंबर वर संपर्क साधून नोंदवावे
अधिक माहितीसाठी संपर्क
राहुल गुंडेकर - 8180088008
प्रतिक झोळ - 8605090161
कुमार शिदे-9561696760
सोनाली मुकणे - 8605189352
प्रसाद चेंडके- 9767720241
अजिंक्य बंगाळे - 9527326312
स्वाती नागपुरे-8007006767
अनिता खरात - 7741865607

