shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रहार चे बाळासाहेब कराळे यांचे घरावर हल्ला ; आप्पासाहेब ढूस यांचे घरावरील हल्ल्याची पुनरावृत्ती..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे 
गुरूवार दिनांक ०८ फेब्रूवारी २०२४

प्रहार चे बाळासाहेब कराळे यांचे घरावर हल्ला ; आप्पासाहेब ढूस यांचे घरावरील हल्ल्याची पुनरावृत्ती..!!

राहुरी : प्रहार जनशक्ती पक्षाचे कामगार संघटक तथा प्रहार श्रमिक सेवा संघाचे सचिव देवळाली प्रवरा येथील बाळासाहेब कराळे यांचे  घरावर काल सोमवार दि. ०५ फेब्रुवारी २०२४ रोजी मध्यरात्री जवळपास १२.३० वाजता चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. याबद्दल राहुरी पोलीस ठाण्यात परिसर पुन्हा दाखल झाला असून राहुरीचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू झाला आहे. 
       देवळाली प्रवरा ता. राहुरी जि. अहमदनगर येथील कुंभार गल्लीत राहत असलेल्या बाळासाहेब कराळे यांचे घरी घटनेच्या प्रसंगी कराळे यांच्या पत्नी व मुले घरात झोपलेले असताना मध्यरात्री चार ते पाच लोकांनी काठ्या हातात घेवुन पायाने लाथा घालून दार तोडण्याचा प्रयत्न केला. परंतू कराळे यांची पत्नी व मुले यांना जाग आल्याने व काही कामानिमित्त बाहेरगावी असलेले बाळासाहेब कराळे नेमके त्याच प्रसंगी घरी आल्याने पुढील अनर्थ टळला व या हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.

     प्रसंगी बाळासाहेब कराळे यांनी त्या हल्ला करणाऱ्या व्यक्तींपैकी एका व्यक्तीला ओळखले असल्याची माहिती सांगितली असून.. हल्ला करताना,  तुम्ही तालुक्याचे आमदार बदलायला निघाले का? तसेच..  कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठका घेता का? जास्त शहाणे झाले का? तुमचा गेम आम्ही वाजवणार आहोत.. बाहेर या..!  अशा पद्धतीच्या आणि जिवे मारणेच्या धमक्या आणि शिवीगाळ घटनेच्या प्रसंगी हे अज्ञात व्यक्ती करत असल्याचे आमचे प्रतिनिधीशी बोलताना बाळासाहेब कराळे यांनी सांगीतले. तसेच राहुरी पोलीस ठाण्यात सकाळी रितसर फिर्याद नोंदविण्यात आली असल्याचेही कराळे यांनी सांगितले. 

     प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांचे देवळाली प्रवरा येथील घरावरही तीन महिन्यांपूर्वी असाच दहशत निर्माण करण्याचा प्रसंग घडला होता.  त्याचा तपास लावण्यात राहुरी पोलिसांना अद्याप पर्यंत यश आले नसताना पुन्हा देवळाली प्रवरा मधील प्रहारच्याच पदाधिकाऱ्यांच्या घरावर हा दुसरा भ्याड हल्ला घडावा ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे.  
प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तात्काळ सोडविले जात असल्याने देवळाली प्रवरा मधील प्रहार चे विरोधक हवालदिल झालेले आहेत. देवळाली प्रवरा मधील दादागिरी आणि गुंडगिरी प्रहार मुळे संपुष्टात आली असल्याने हतबल झालेले दहशतखोर अशा पद्धतीचे भ्याड हल्ले करून ते प्रहारच्या कार्यकर्त्यांना भिती घालवून दहशत पसरवीत असावेत. अशा भ्याड हल्ल्याना आणि दहशत पसरविनारांना आम्ही भिक घालीत नाहीं.  प्रहारचे कोणतेही सामजिक कार्य त्यामुळे थांबणार नाही. तर प्रहार चे संस्थापक आदरणीय बच्चुभाऊ कडू यांचे मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाप्रमुख अभिजीत दादा पोटे यांचे सहकार्याने ते कार्य दुप्पट वेगाने सुरुच राहील अशी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया आप्पासाहेब ढूस यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना दिली. 

          पुढे बोलताना ढूस म्हणाले की, स्वतःचे विकासातील अपयश झाकण्यासाठी आणि प्रहारचे कार्य रोखण्यासाठी आमच्या आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या घरावर हल्ला करून गावात दहशत माजविण्यापेक्षा.. पन्नास वर्षात देवळाली प्रवरा शहरामध्ये एसटी स्टँड, पोलीस स्टेशन, जिल्हा रुग्णालय, क्रीडांगण किंवा एकही शैक्षणिक संस्था आणि मोठा उद्योग उभा राहू शकला नाही याकडे या दहशतखोर मंडळींनी लक्ष देणे गरजेचे आहे.

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close