*बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने विजबिल एक रकमी भरण्याची जाचक अट रद्द करण्यासंदर्भात महावितरण ला दिले निवेदन.
इंदापूर : (प्रतिनिधी)
बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आज (दि. १६) रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या इंदापूर शाखेस एक रकमी विजबिल भरणा करण्याची जाचक अट रद्द करण्यासंदर्भात निवेदन पत्र दिले.
सदर निवेदन पत्रात नमूद केली आहे की,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी इंदापूर शाखा या कार्याला बाबत विज बिल भरणा एक रकमी मागणी होत असल्याबाबत तसेच सदरचा भरणा एक रकमी न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्याच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत. महागाई बेरोजगारांनी सर्वसामान्य जनता आधीच त्रस्त आहे. यातच महावितरण ने एक रकमे वीज बिल भरणा करण्याचा आदेश काढून सर्वसामान्यांच्या तोंडाचे पाणी पळवले आहे .सदरचा आदेश सर्वसामान्य जनतेच्या जीविताच्या हक्कावर विपरीत परिणाम करणार आहे .नवे हा आदेशच संविधानाचे उल्लंघन करणार आहे .तरी विनंती आहे की संविधान विशेष भूमिका घेऊ नये. ग्राहकांना सुलभ हप्त्यामध्ये भरणा करण्याची सोय करून द्यावी. अन्यथा आम्हास महावितरण विरोधात कठोर आणि संघटनात्मक आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. याची नोंद घेऊन सदर आदेश स्थगित करावा अशा आशयाचे संतोष शिरसागर यांच्या सहीचे निवेदन पत्र देण्यात आले.
सदर निवेदन देताना वसिम शेख, सुरज धाईंजे, संतोष क्षीरसागर, नागेश भोसले, शेखर चव्हाण, विनोद शिंदे, सोहेल शेख, फैजान मुजावर, भैय्या परदेशी, राजू कांबळे, श्रेणिक साळुंखे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

